शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सचिन पिळगांवकरांचा पत्नीसह भन्नाट डान्स, लेक श्रियाने शेअर केला खास व्हिडीओ

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2024 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sachin and Supriya Pilgaonkar wedding anniversary Shriya shared their romantic dance video

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सचिन पिळगांवकरांचा पत्नीसह भन्नाट डान्स, लेक श्रिया पिळगांवकरने शेअर केला खास व्हिडीओ

मराठी चित्रपटसृष्टीतलं सगळ्यात लोकप्रिय जोडपे सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. कित्येक चित्रपटात त्यांनी पती पत्नी म्हणून एकत्र काम केलं. वयात असणाऱ्या अंतराला झुगारून त्यांनी आपला संसार यशस्वी करून दाखवला. अशातच आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. सुप्रिया आणि सचिनच्या लग्नाला ४० वर्षे झाली आहेत. दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. याच लग्नाच्या वाढदिवसानिमित त्यांनी हटके सेलिब्रेशन केलं आहे आणि याची खास झलक त्यांची मुलगी श्रियाने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. (Sachin and Supriya Pilgaonkar wedding anniversary)

आपल्या नानाविध भूमिका व अभिनयाने चर्चेत राहणारी श्रिया सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सचिन-सुप्रिया पिळगावकर ‘सपनों में मिलती है’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओत दोघांची केमिस्ट्री आणि रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

आणखी वाचा – …अन् लेक पायलट असलेल्या विमानातून अलका कुबल यांची हवाई सफर, खास फोटोही केला शेअर, नेटकऱ्यांसह कलाकारांनीही केलं कौतुक

या व्हिडीओमध्ये सचिन-सुप्रिया अगदी बेभान होऊन डान्स करत आहेत. “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा… तुम्ही जन्मालाच सुपरस्टार म्हणून आला आहात. नच बलिये सीझन १ चे विनर”, असं कॅप्शन श्रियाने सचिन-सुप्रिया यांच्या डान्सची खास झलक शेअर केली आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स् करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्स करत सचिन व सुप्रिया पिळगांवकरांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

आणखी वाचा – “मी कायद्याचे पालन करणारा…”, हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणावर अल्लू अर्जुन स्पष्टच बोलला, “म्हणाला, “पोलिसांच्या परवानगीनेच…”

दरम्यान, सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर यांनी १९८५ साली लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ३९ वर्ष झाली आहेत. त्यांना श्रिया पिळगांवकर ही एकुलती एक मुलगी आहे. सचिन-सुप्रिया यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा अनेक चिटपटांमधून काम केलं आहे. तर आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रियादेखील कलाविश्वात सक्रीय आहे.

Tags: Sachin and Supriya Pilgaonkar wedding anniversarysachin pilgaonkarsupriya pilgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
poet and actor Surendar Sharma commented on his argument with Kapil Sharma and not appearing on his show.

“मला त्याची गरज नाही”, सुप्रसिद्ध कवी व अभिनेत्याची कपिल शर्मावर आगपाखड, म्हणाले, “तो प्रसिद्ध नव्हता तेव्हा ...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.