शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईच्या आठवणीत अमिताभ बच्चन भावुक, शेवटच्या क्षणांबाबत बोलताना पाणावले डोळे, म्हणाले, “मृत्यूवेळी ती…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 21, 2024 | 3:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
amitabh bachchan mother post

अमिताभ बच्चन आईच्या आठवणीत झाले भावुक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करत आहेत. सध्या केबीसीचे १६ वे पर्व सुरु आहे. यावेळी अमिताभ यांनी आईच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शनिवारी बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर आईचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तसेच या पोस्टवर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टमध्ये अमिताभ यांनी काय लिहिले आहे? हे आपण आता जाणून घेऊया. (amitabh bachchan mother post)

अमिताभ यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “आज २१ डिसेंबर : आठवणीत…माझ्या डोळ्यांच्या समोर, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण”. अमिताभ यांनी आईचे दीर्घ आजाराने २१ डिसेंबर २००७ साली निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९३ वर्षांच्या होत्या. २०१७ साली अमिताभ यांनी आईबरोबरच्या शेवटच्या प्रसंगाबद्दल भाष्य केले. त्यांनी लिहिले की, “त्यांची जगण्याशी लढाई सुरु होती. तिथे असणारे डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पण आईचे हृदय साथ देत नव्हतं”.

आणखी वाचा – “माझ्या आडनावावरुन…”, सततच्या ट्रोलिंगवर भडकला अर्जुन कपूर, म्हणाला, “मी अभिनय करण्याच्या लायकीचा…”

T 5230 – माँ pic.twitter.com/6uueZRR5Ri

— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 20, 2024

पुढे त्यांनी लिहिले की, “आईच्या छातीवर हात ठेऊन दिलेला PCR बघून मला खूप दु:ख होत होतं. मशीनने हार मानली होती. आईचे आयुष्य थोड्या वेळासाठी थांबले असते आणि ती परत येऊ शकली असती. आम्ही एकमेकांचा हात पकडून उभे राहिलो आणि आईला जाताना पाहिलं”.

आणखी वाचा – अक्षया देवधर पुन्हा मालिकेत काम करणार कळताच सासूबाई एकदम खूश, प्रोमो पाहून भारावल्या, म्हणाली, “टीव्हीवर दिसणार म्हणून…”

अमिताभ नेहमी त्यांच्या मनातील गोष्ट ब्लॉगवर लिहिताना दिसतात. याआधी बीग बी यांनी अभिषेक व ऐश्वर्याच्या खासगी आयुष्यावर सुरु असणाऱ्या चर्चांवरदेखील भाष्य केले होते. त्यांनी लिहिले होते की, “मी कुटुंबाबद्दल जास्त काही बोलत असतो. हे माझं डोमेन आहे आणि याचा गोपनियतेची काळजी घेतली जाते. चर्चा होत राहतात आणि लोक अंदाज लावत बसतात”. अमिताभ यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.   

Tags: amitabh bachchanbollywood actormother death anniversary
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Bollywood singer Honey Singh commented on life, his controversy with Shahrukh Khan, illness and conflict in the Netflix Famous documentary

दीड तासाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंहने प्रेक्षकांना काढलं वेड्यात, शाहरुख खानच्याच नावावर सगळा गेम अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.