शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहीद व करीना कपूरला पुन्हा एकदा एकत्र पाहून चाहत्यांना ‘जब वी मेट’ची आठवण, ‘तो’ फोटो व्हायरल होताच म्हणाले…

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 20, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kareena kapoor and shahid kapoor viral photo

शाहिद व करीनाचा फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र बॉलिवूड कलाकारांच्या मुलांच्या स्नेहसंमेलनाची चर्चा सुरु आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कलाकार त्यांच्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी पोहोचले. यावेळी  ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडीही लेकीच्या शाळेत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. आपल्या लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी हे स्टार जोडपं एकत्र पोहोचलं होतं. यावेळी आराध्याचे आजोबा ‘बिग बी’सुद्धा उपस्थित होते. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी यावेळी काळ्या रंगाचे कपडे घालून ट्विनिंग  केलं होतं. आराध्याच्या शाळेत बच्चन कुटुंबीय एकत्र सहभागी झालं होतं आणि याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. अशातच आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. (kareena kapoor and shahid kapoor viral photo)

अभिनेत्री करीना कपूर व सैफ अली खान हे तैमुरसाठी पोहोचले होते. करीनाची बहीण करिश्मा कपूरदेखील मुलांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचली. याचवेळी शाहिद कपूर व पत्नी मीरा राजपूतदेखील दिसून आले. हे दोघंजण मिशा व जैन यांना सपोर्ट करण्यासाठी पोहोचले होते. याव्यतिरिक्त कार्यक्रमातील एका दृश्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. शाहिद व करीना यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा – “आता स्वर्गात जाऊन श्रीदेवीला अटक करणार का?”, अल्लू अर्जुनच्या कारवाईवर सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं भाष्य, म्हणाले, “प्रत्येक कलाकाराने…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहिद करीनाच्या मागे बसलेला दिसून येत आहे. या जोडीला पुन्हा एकत्रित पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. सगळ्यांना ‘जब वी मेट’ या चित्रपटातील गीत व आदित्यची आठवण आली. या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे दृश्य खूप छान आहे. बेबो व शाहीद एकाच फ्रेममध्ये”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “बॉलिवूड एकाच ठिकाणी आहे. यांना शांत बघून बरं वाटत आहे”.

आणखी वाचा – ‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेत्याने तब्बल ४२ किलो वजन केलं कमी, बायकोबरोबरचा फोटो पाहून चाहते थक्क, म्हणाले…

शाहिद  व करीनाचा फोटो पाहून ‘जब वी मेट’ चित्रपटाच्या सगळ्या आठवणी चाहत्यांनी ताज्या केल्या आहेत. गीत व आदित्य ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. हे आठवत एका नेटकऱ्याने लिहिले की, “ते नेहमीच गीत व आदित्य राहतील”. तसेच दुसऱ्या एकाने मस्करीत लिहिले की, “गीत व आदित्य आता त्यांच्या मुलाला वेगवेगळ्या लोकांबरोबर बघत आहेत”. या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.

Tags: kareena kapoorshahid kapoorviral photo
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
sambhavna seth miscarriage

लग्नाच्या नऊ वर्षांनी गुडन्यूज मिळाली पण...; तिसऱ्या महिन्यातच गर्भपात, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, “६५ इंजेक्शन्स…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.