शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेत्याने तब्बल ४२ किलो वजन केलं कमी, बायकोबरोबरचा फोटो पाहून चाहते थक्क, म्हणाले…

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 20, 2024 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ram kapoor transformation

राम कपूर यांचा बदललेला लूक पाहिलात का?

‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका अधिक लोकप्रिय ठरली. या मालिकेमधील राम व प्रिया या भूमिका अधिक आवडीच्या होत्या. राम कपूर व साक्षी तन्वर यांच्या मुख्य भूमिका बघायला मिळाल्या. दोघांच्याही जोडीला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले. या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आशा अनेक चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र आता ही मालिका नाही तर राम आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. गोलू-मोलू असलेल्या रामचा बदललेला लूक बघायला मिळत आहे. एका कार्यक्रमादरम्यान राम दिसून आला होता. त्यावेळी त्याला बघून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. (ram kapoor transformation)

राम सध्या ५१ वर्षाचे आहेत. ‘युधरा’ या चित्रपटामध्ये तो शेवटचा दिसून आला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी सोशल मीडियावर ब्रेक घेतला होता. मात्र काही तासांपूर्वी त्यांनी शेअर केला आहे. ज्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. काही तासांपूर्वी राम यांनी पत्नी गौतमी कपूरबरोबर एक फोटो शेअर केला यामध्ये त्यांनी तब्बल ४२ किलो वजन कमी केलेले दिसून येत आहे. यामुळे अनेकांनी राम यांचे कौतुकदेखील केले आहे.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत सुरु होणार नवा अध्याय, अक्षरा देणार गरोदरपणाची खुशखबर, प्रोमो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor)

राम यांनी एक फोटो शेअर करत लिहिले की, “हेलो मित्रांनो, इन्स्टाग्रामवरुन ब्रेक घेतला होता. त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो. मी स्वतःवर काम करत होतो”. या फोटोमध्ये राम यांनी कमालीचे वजन कमी केलेले दिसून आले. तसेच त्यांच्या या फोटोवर अनेक कलाकारांनीदेखील प्रतिक्रिया देत कौतुक केले आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “खूप मोठा बदल झालेला आहे. मला तुमची ‘बडे अच्छे…’ ही मालिका अधिक आवडते”.

आणखी वाचा – घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिषेक-ऐश्वर्या एकत्र, लेकीच्या शाळेत दोघांनी लावली हजेरी, अभिनेत्याच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ठीक आहे. आता आम्हाला समजलं की हे इतकं रहस्य का होतं ते”. तसेच एकाने लिहिले की, “आमचा लहानपणीचा क्रश पुन्हा एकदा सेक्सी झाला आहे”. तसेच काही लोकांनी राम यांचा आधीचा लूक चांगला होता असेही लिहिले आहे.

Tags: bade acche lagte hainram kapoortelevision actor
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Sonnalli Seygall Postpartum Depression

बाळाच्या जन्मानंतर सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय मानसिक त्रास, म्हणाली, "गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.