गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियारवर व्हायरल होताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांपासून वेगळे राहतात, ऐश्वर्याला फक्त तिच्या लेकीची साथ आहे. तसंच जागतिक पातळीवर पार पडलेल्या महोत्सवात तिच्या नावातून बच्चन आडनाव हटवल्यानंतर ऐश्वर्या व बच्चन कुटुंबियांमध्ये आलबेल नसल्याचे अनेक वृत्त समोर आलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर एका कौटुंबिक सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे अभिषेक-ऐश्वर्या एकत्र आनंदी झाल्याचं स्पष्ट झालं होतं. (Abhishek Bachchan and Aishwarya Rai together)
अशातच आता ही दोघे आपल्या लेकीसाठीही पुन्हा एकत्र आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बहुतांश सगळ्याच शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव साजरा केला जातो. तसंच सेलिब्रिटींच्या मुलांच्या शाळेतही हे स्नेहसंमेलन पार पडते. धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये देखील शालेय मुलांसाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाळेतील सगळी मुलं आपलं कलाकौशल्य सादर करतात. या कार्यक्रमाला सगळे सेलिब्रिटी आपल्या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहिले होते.
आणखी वाचा – प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव करतायत ४० वर्षे लहान अभिनेत्रीला डेट?, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडीही लेकीच्या शाळेत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. आपल्या लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी हे स्टार जोडपं एकत्र पोहोचलं होतं. यावेळी आराध्याचे आजोबा आणि महानायक ‘बिग बी’सुद्धा उपस्थित होते. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी यावेळी काळ्या रंगाचे कपडे घालून Twinning केलं होतं. आराध्याच्या शाळेत बच्चन कुटुंबीय एकत्र सहभागी झालं होतं आणि याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा – श्वेता शिंदेंनी किरण-वैष्णवी यांना लग्नाच्या दिल्या खास शुभेच्छा, म्हणाल्या, “‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवर…”
याशिवाय गर्दीत धक्का लागू नये यासाठी अभिषेक ऐश्वर्याची विशेष काळजी घेताना दिसला. यावरून दोघांमध्ये सर्वकाही उत्तम असून ऐश्वर्या-अभिषेक एकमेकांबरोबर आनंदी असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनीही कमेंट्स करत वर्षाव केला आहे. “दोघे कायम असेच एकत्र रहा”, “या दोघांना एकत्र पाहून आनंद झाला”, “देव यांना कायम एकत्र ठेवो” या आणि अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.