शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझा नातू माझं स्किट करेल”, अरुण कदम यांचे नातवाविषयी भाष्य, म्हणाले, “मला स्क्रीनवर बघून…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 8, 2024 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame comedy actor Arun Kadam said that his grandson will grow up and he will do his skits

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरुण कदमांचे नातवाविषयी भाष्य, म्हणाले तो माझे स्किट करेल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ‘लाडका दादुस’ म्हणून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. अरुण कदम यांनी आजवर अनेक रिअ‍ॅलिटी शोजमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे महाराष्ट्रासह अवघ्या जगभरात अनेक चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाहते आहेत. अरुण कदम यांचा लहान नातूदेखील या शोचा खूप मोठा चाहता आहे. (Arun Kadam on Grandson)

आपल्या विनोदी भूमिकांनी चर्चेत असणारे हे अरुण कदम हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या पत्नी, लेक व नातवाबरोबरचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. नातू अथांगबरोबर त्यांचा खास बॉण्ड आहे आणि हा खास बॉण्ड चाहत्यांना वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे पाहायला मिळाला आहे. अरुण कदम ही नातवाबरोबरचे अनेक मजेशीर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांचा मुलगादेखील त्यांच्या अभिनयाचा व महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा खूप मोठा चाहता आहे. अनेकदा आपल्या आजोबांना टीव्हीवर बघून तो आनंदी होत असतो.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “माझ्याबरोबर लग्न करणार का?”, चाहत्याचा प्राजक्ता माळीला थेट प्रश्न, अभिनेत्रीही उत्तर देत म्हणाली, “माझं काही…”

अशातच अरुण कदम यांनी आपल्या नातवाबद्दलचे खास भाष्य केलं आहे. इट्स मज्जाशी साधलेल्या संवादात अरुण कदम यांनी त्यांच्या नातवाबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. यावेळी ते असं म्हटले की, “मोबाइलवर वगैरे माझी रील दिसली की तो बाबा बाबा म्हणून ओरडतो. इतकं त्याला कळतं. आमच्या दोघांचे बॉण्डिंग खूप छान आहे. जवजवळ महिनाभर मी आता त्याला भेटलेलो नाही. कार्यक्रमाची टुर आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याला भेटता आलं नाही. पण आता भेटेन”.

आणखी वाचा – ‘पुष्पा २’च्या प्रीमियरला झालेल्या महिलेच्या मृत्यूवर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया समोर, आर्थिक मदतही केली जाहीर

यापुढे अरुण कदम असं म्हणाले की, “तो नेहमीच अपडेट होत असतो. आम्ही दोघे जेव्हाही भेटतो तेव्हा तो नवीन काही तरी शिकलेला असतो. नवीन काहीतरी त्याच्याकडे आलेलं असतं. म्हणजे तो मासा कसा करतो ही करुन दाखवतो. सगळ्या गोष्टी तो आता शिकत चालला आहे. म्हणजे आता दीड वर्षांचाच आहे, पण आता मोठा झाला तर कदाचित माझं स्किटसुद्धा तो करु शकेल”.          

Tags: arun kadamarun kadam maharashtrachi hasya jatraArun Kadam on Grandson
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
musician A. R. Rahman taking a break from music for one year After the announcement of divorce daughter Khatija commented on rumors

घटस्फोटाच्या घोषणेनंतर ए. आर. रहमान संगीतातून एक वर्षांचा ब्रेक घेणार?, लेकीने केला वडिलांच्या निर्णयाचा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.