प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देण्याची घोषणा केली. रहमान यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून ते चर्चेत आहेत. या बातमीने रहमानच्या चाहत्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर रहमान यांच्याविषयीच्या अनेक अफवा सोशल मीडियावर पसरताना पाहायला मिळत आहेत. आशातच आणखी एका बातमीने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर ए. आर. रहमान आपल्या करिअरमधून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की रहमानने एका वर्षासाठी संगीत इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Khatija on A. R. Rahman taking break from music rumors)
मात्र, आता गायिकेची मुलगी खतिजा रहमानने या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. रेहमानने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या समस्यांमुळे एका वर्षासाठी आपल्या करिअरमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याचा दावा अलीकडील अहवालात केला जात आहे. तथापि, यावर गायक किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, आता खतिजाने तिच्या एक्स अकाउंटवर या बातम्यांचे खंडन केले आहे.

एका नेटकऱ्याने रहमान आता एक वर्षाचा ब्रेक घेणार असून आम्ही त्यांचे संगीत मिस करु असं म्हटलं. या यूजरच्या पोस्टवर कमेंट करत खतिजा यांनी लिहिले की, “कृपया अशा निरुपयोगी अफवा पसरवणे थांबवा”. आता खतिजा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे ए. आर. रहमानच्या चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रहमान ब्रेक घेणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम लागला आहे.
दरम्यान, दरम्यान, ए. आर. रहमान व सायरा बानो यांनी याआधी एका निवेदनाद्वारे विभक्त होण्याची घोषणा केली होती. दोघेही बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होते. घाईघाईत कोणताही निर्णय झालेला नाही. सायरा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, त्या आता हे नातं वाचवू शकत नाहीत आणि त्यामुळे अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.