शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नवऱ्याला वरमाला घालताना रेश्मा शिंदेच्या डोळ्यांत आनंदाश्रू, मंडपातील उपस्थितही ‘तो’ क्षण पाहून भारावले, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 29, 2024 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Reshma Shinde getting emotional when she marrying video viral on social media

नवऱ्याला वरमाला घालताना रेश्मा शिंदे भावुक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर तिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत. “आयुष्याची नवीन सुरुवात…” असं म्हणत रेश्मानं लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. रेश्मा आज २९ नोव्हेंबर , शुक्रवार रोजी विवाहबंधनात अडकली आहे. रेश्माचे जवळचे कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या खास उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. (reshma shinde emotional)

पहिलं केळवण, घरगुती मेहंदीसोहळा, हळदी समारंभ, होणाऱ्या नवऱ्याची ओळख असा प्रवास करत आज रेश्मा आणि पवन साता जन्माचे सोबती झाले आहेत. अभिनेत्रीने लग्न लागताना गुलाबी रंगाची साडी नेसली होती. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर या मराठमोळ्या लूकमध्ये रेश्मा अतिशय सुंदर दिसत होती. तर नवऱ्याने लग्न लागताना ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी आणि रेश्माच्या साडीला मॅचिंग असा त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतला होता.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – ज्योतिबा फुले पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान, अभिमानास्पद क्षण, म्हणाले, “अकरावी-बारावीत असताना…”

अशातच आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये रेश्मा तिच्या नवऱ्याला वरमाला घालत आहे आणि वरमाला घालताना रेश्मा काहीशी भावुक झाली आहे. तसंच रेश्माने वरमाला घातल्यानंतर ती तिच्या नवऱ्याची नजरही काढते. त्यानंतर अभिनेत्रीचा नवरा पवन हादेखील तिला वरमाला घालतो. या जोडीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला रेश्माच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची होणारी बायको नक्की आहे कोण?, मराठी मालिकांमध्येही केलंय कमालीचं काम, फोटो व्हायरल

रेश्मा शिंदेच्या लग्नापुर्वीच्या फोटोंनीही साऱ्यांचे लक्ष वेधले होते. अभिनेत्रीने दाक्षिणात्य व मराठमोळ्या अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला आहे. या दोन्ही लूकचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिच्या कामाबद्दल बोलायच झालं तर ती सध्या स्टार  प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे

Tags: reshma shinde emotionalreshma shinde marriage emotionalreshma shinde marriage news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kalki Koechlin on anurag kashyap divorce

अनुराग कश्यपबरोबरच्या घटस्फोटनंतर कल्की कोचलिनची होती वाईट अवस्था, भाड्यावरही घर मिळालं नाही तेव्हा…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.