गेल्या काही दिवसांपासून रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर तिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत. “आयुष्याची नवीन सुरुवात…” असं म्हणत रेश्मानं लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. रेश्मा आज २९ नोव्हेंबर , शुक्रवार रोजी विवाहबंधनात अडकली आहे. रेश्माचे जवळचे कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या खास उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. (reshma shinde emotional)
पहिलं केळवण, घरगुती मेहंदीसोहळा, हळदी समारंभ, होणाऱ्या नवऱ्याची ओळख असा प्रवास करत आज रेश्मा आणि पवन साता जन्माचे सोबती झाले आहेत. अभिनेत्रीने लग्न लागताना गुलाबी रंगाची साडी नेसली होती. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर या मराठमोळ्या लूकमध्ये रेश्मा अतिशय सुंदर दिसत होती. तर नवऱ्याने लग्न लागताना ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी आणि रेश्माच्या साडीला मॅचिंग असा त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतला होता.
आणखी वाचा – ज्योतिबा फुले पुरस्काराने नागराज मंजुळे यांचा सन्मान, अभिमानास्पद क्षण, म्हणाले, “अकरावी-बारावीत असताना…”
अशातच आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये रेश्मा तिच्या नवऱ्याला वरमाला घालत आहे आणि वरमाला घालताना रेश्मा काहीशी भावुक झाली आहे. तसंच रेश्माने वरमाला घातल्यानंतर ती तिच्या नवऱ्याची नजरही काढते. त्यानंतर अभिनेत्रीचा नवरा पवन हादेखील तिला वरमाला घालतो. या जोडीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओला रेश्माच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
रेश्मा शिंदेच्या लग्नापुर्वीच्या फोटोंनीही साऱ्यांचे लक्ष वेधले होते. अभिनेत्रीने दाक्षिणात्य व मराठमोळ्या अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला आहे. या दोन्ही लूकचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिच्या कामाबद्दल बोलायच झालं तर ती सध्या स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे