बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजवर अनेक चित्रपटांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली आहे. २०११ साली कल्की प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र २०१५ साली दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर कल्की अधिक चर्चेत आली. नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये तिने घटस्फोटानंतर आयुष्यात काय बदल झाले? त्याबद्दल सांगितले आहे. घटस्फोट झाल्यानंतर एकटं राहणं किती कठीण होतं. तसेच कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला याबद्दल ती सांगताना दिसली. एकटीसाठी घर शोधताना अनेक समस्यांचा सामना तिला करावा लागला होता. याबद्दल ती पहिल्यांदाच बोलताना दिसली आहे. (Kalki Koechlin on anurag kashyap divorce)
कल्कीने ‘आफ्टरआव्हर्स विद ऑल अबाऊट इव्ह’ या युट्यूब चॅनलबरोबर संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, “जेव्हा माझा आणि अनुरागचा घटस्फोट झाला तेव्हा ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ व ‘ये जवानी है दिवानी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. नंतर माझा घटस्फोट झाला. नंतर मला राहाण्यासाठी जागादेखील नाही मिळाली. कोणीही मला मुंबईमध्ये एकटी महिला म्हणून भाड्यावर कोणीही घर देत नव्हतं”.
पुढे ती म्हणाली की, “मी विचार करायचे की मी प्रसिद्ध आहे. तुम्हाला माझ्याबरोबर सेल्फी घ्यायचा असतो पण तुम्हाला मला घर द्यायचे नसते”. कल्कीने अनुरागचा चित्रपट ‘देव डी’ या चित्रपटातून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर लगेच दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. नंतर लगेच २०११ साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान तिचा एक इस्रायली बॉयफ्रेंडबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. २०१९ साली तिने गरोदर असल्याची घोषणा केली होती. २०२३ साली ती ‘खो गये हम कहा’ या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. तसेच गेल्या वर्षी ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात एक आयटम नंबर करतानादेखील दिसली होती. अनुरागच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन करताना दिसून येतो.