शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : “अनुष्का मालकीण म्हणून आवडेल का?”, अहिल्यादेवींच्या प्रश्नावर पारूचं काय असेल उत्तर?, प्रोमोने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 28, 2024 | 4:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Marathi Serial Promo

अहिल्यादेवींच्या प्रश्नावर पारूचं काय असेल उत्तर?, प्रोमोने वेधलं लक्ष

Paaru Marathi Serial Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत खूप मोठी रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या पारू व आदित्य यांच्या मैत्रीत दुरावा आला असल्याचं पाहायला मिळत आहे. पारू व आदित्य यांच्या मैत्रीत अनुष्का नावाचं सावट आलं आहे. अनुष्काच्या येण्याने मालिकेत खूप मोठं वादळ येणार असल्याचं दिसतंय. अनुष्काचा खरा चेहरा अद्याप समोर आलेला नसून ती अहिल्यादेवी व किर्लोस्कर कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. अनुष्काने उत्तम खेळ खेळत साऱ्यांची मनं जिंकली आहेत. अनुष्काचा स्वभाव घरातील सगळ्यांना आवडला असून किर्लोस्करांची सून म्हणून तिला पसंतही केलं आहे.

एकीकडे, आदित्यच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अहिल्यादेवी अनुष्काला आदित्यसाठी मागणी घालणार आहेत. मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, अहिल्यादेवी अनुष्काच्या घरी जातात. यावेळी त्या पारूलाही बरोबर घेऊन जातात. घरी आल्यावर अनुष्का तिच्या मामीबरोबर सगळ्यांची ओळख करुन देते. त्यांनतर त्या मीटिंगला सुरुवात करतात. अहिल्यादेवी अनुष्काच्या घरी असतानाचा एक प्रोमो दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित कऱण्यात आला.

आणखी वाचा – ‘प्यार का पंचनामा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या दिड वर्षांनंतर झाली आई, घरी चिमुकलीचं आगमन, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या प्रोमोमध्ये, अहिल्यादेवी अनुष्काजवळ आदित्यच्या वाढदिवसाला खास सरप्राईज देण्याबाबत बोलतात. अहिल्यादेवी अनुष्काला असं म्हणताना दिसत आहेत की, “उद्या आदित्यचा वाढदिवस आहे. त्याला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे. तू त्याच्या आयुष्यात येणं यापेक्षा अजून स्पेशल काहीच असू शकत नाही. तुझा जर होकार असेल तर तू उद्या येशील”. आता अनुष्का आदित्यच्या वाढदिवसाला पोहोचून होकार कळवणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या असतानाच मालिकेच्या समोर आलेल्या आणखी एका प्रोमोने प्रेक्षकांना धक्का दिला आहे.

आणखी वाचा – दृष्टी धामीने लेकीचं केलं बारसं, पहिल्यांदाच सांगितलं नाव, अर्थही आहे फारच खास

समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अहिल्यादेवी व पारू एकमेकींशी बोलताना दिसत आहेत. यावेळी अहिल्यादेवी पारूला असं विचारताना दिसत आहेत की, “मला आदित्यची बायको म्हणून अनुष्का आवडली आहे. पारू तू सांग तुला आवडलीय का अनुष्का?, तुझी नवीन मालकीण म्हणून तुला ती आवडेल का?”. आता पारू यावर काय उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serialPaaru Marathi Serial Promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Yeh Hai Mohabbatein fame actor Abhishek Verma and Iditri Goyal Engagement photo viral on social media

'ये है मोहब्बतें' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा थाटामाटात साखरपुडा, होणाऱ्या बायकोसह शेअर केले रोमँटिक फोटो, शुभेच्छांचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.