आपलं स्वतःच हक्काचं घर असावं असं प्रत्येक माणसाचं स्वप्न असत, कलाकार मंडळीही या स्वप्नांपासून लांब नाहीत. अशातच एका कलाकार जोडीचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे सिनेविश्वातील क्युट कपलपैकी एक आहे. सिद्धार्थ आणि मिताली दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांचा चाहतावर्गही बराच मोठा आहे. गेल्या वर्षी त्यांनी स्वतःच असं घर घेतलं, आणि आज त्यांना स्वतःच घर घेऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. (mitali siddharth new house)
एक वर्ष पूर्ण होताच मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ आणि मिताली यांचा खिडकीजवळ उभा राहून काढलेला एक फोटो दिसतोय, आणि त्याखाली मितालीने दिलेलं कॅप्शन अधिक लक्षवेधी ठरतंय. मितालीने त्याखाली एक कविता लिहीत घर घेण्याच्या स्वप्नांपासून घर घातल्यापर्यंतचा प्रवासाच वर्णन पाहायला मिळतंय.
पाहा मितालीने घराची वर्षपूर्ती होताच केली खास कविता (mitali siddharth new house)
वही हम हैं, वही तुम हो, बस खिड़की ज़रा बदली हैं, सपनोवाली थी पहले, अब सुकून से भरी हैं | कई रातें जाग कर, कई क़िस्से जोड़के.,उमीद की ईंट से, तुझे बनाया हैं | कई छत, कई कमरे, साथ थे इस दरमियाँ, तब जाके “अपनेवाले”, “घर” की खिड़की को पाया हैं | असं कवितेच्या स्वररूपात मितालीने कॅप्शन दिलं आहे. (mitali siddharth new house)
हे देखील वाचा – ‘जुजबी’ देत सईने दिलं समीरला हटके गिफ्ट
बरं हे कॅप्शन लिहायला तिला गायक रोहीत राऊत याने मदत केली आहे. त्यामुळे या कॅप्शनमध्ये तिने रोहितचे आभार मानले आहेत. भावना व्यक्त करायला योग्य शब्द जोडलेस त्यामुळे तुझे आभार असं म्हणत तिने रोहितचे आभार व्यक्त केले आहेत. या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे, असं तिने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर सीमा चांदेकर यांनी ‘तुम्हा दोघा सारखंच घर स्वीट.. होम स्वीट होम’ अशी कमेंट केली आहे.(mitali siddharth new house)
मिताली आणि सिद्धार्थ हे त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून एकमेकांना नेहमीच वेळ देताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच हे जोडपं डिझनी लँडची सफर करायला गेले होते तेथील बरेच फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून पोस्ट देखील केले होते.
