शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचं भाष्य, म्हणाली, “खरं बोलण्याची इतकी मोठी शिक्षा…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 27, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
rupali ganguly step daughter post

'अनुपमा'फेम रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

टेलिव्हीजनवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ मालिकेतील मुख्य भूमिका सकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या खूप चर्चेत आहे. रुपाली व तिची सावत्र मुलगी ईशा वर्मा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे वाद सुरु आहेत. सोशल मीडियावर ईशाने अनेक व्हिडीओ शेअर केले होते. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चादेखील सुरु झाली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी रुपालीने सावत्र मुलीच्या विरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. यावरुन आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दरम्यान आता यावरुनच ईशानेदेखील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने वडिलांबद्दलही भाष्य केले आहे. (rupali ganguly step daughter post)

ईशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रुपालीकडून करण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या मानहानीबद्दल भाष्य केले तसेच वडिलांनादेखील सुनावलं आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, “या महिन्याच्या सुरुवातीला मी खूप कठीण निर्णय घेतला. यामध्ये मी माझ्या वडिलांबरोबर कशी मोठी झाले याबद्दल सगळं सांगितलं. याबद्दल मी सगळं काही शेअर केलं. माझ्या या निर्णयाने सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. समोरा समोर बोलणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण गेल्या अनेक वर्षांचे मौन पाळल्यानंतर माझ्या आयुष्यात शांती आली आहे”.

आणखी वाचा – “ते मुसलमान आहेत म्हणून…” संभल येथील हिंसेबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य म्हणाली, “नागरिकांची हत्या…”

तिने लिहिले की, “गेल्या २४ वर्षांपासून मी अडकले होते. मला माझ्या बोलण्याने कोणाला दुखी करायचं नव्हतं. पण हे सगळं बोलणं मला गरजेचं होतं. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की स्वतःच्या मुलाला खरं बोलण्याची इतकी मोठी शिक्षा मिळू नये. मी एक तरुण मुळही आहे पण मी अजूनही माझ्या वडिलांची मुलगी आहे. त्यांनी मला खूप क्रूरपणे उत्तर दिलं आहे. हाच त्यांचा खरा चेहरा आहे”.

आणखी वाचा – “बिहारी रस्त्यावरचा गुंड…”, शत्रुघ्न सिन्हाच्या सासूबाईंचा लग्नाला होता विरोध, म्हणाल्या होत्या, “फिल्म इंडस्ट्रीतील…”

नंतर ती म्हणाली, “या सगळ्या प्रकरणात माझं हे शेवटचं बोलणं आहे. यामधून मला सगळे गैरसमज दूर करायचे आहेत. तसेच माझ्या आयुष्यातील सगळ्या समस्या मला दूर करायच्या आहेत. यानंतर मी एकाही मुलाखतीमध्ये किंवा या चर्चांवर अजिबात सहभाग घेणार नाही”.  दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रुपाली यावर काय उत्तर देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: Rupali gangulystep daughterviral post
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Madhuri Dixit

परदेशी स्थित माधुरी दीक्षित भारतात का परतली?, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, "आई-वडिलांचं वय झालं होतं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.