महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे काही दिवसांपूर्वीच लग्नबंधात अडकला.

अचानक दत्तूने त्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरून शेअर केल्यानं सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. दत्तूच्या आणि स्वातीच्या प्री वेडिंग फोटोशूटच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच हवा केली.

लग्न संभारंभ, प्री वेडिंग फोटोशूट उरकल्यानंतर दत्तू त्याच्या बायकोला घेऊन हनिमूनला बाली येथे गेला होता. (Dattu More Unseen Photoshoot)

दत्तूने २३ मे २०२३ रोजी स्वातीसोबत लगीनगाठ बांधली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा त्याचा लग्नसोहळा पार पडला. दत्तूची पत्नी ही गायनॉलॉजिस्ट आहे.

दत्तूने त्यांच्या लग्नाची बातमी ही अचानकचं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून दिली होती.

त्यानंतर आता लग्न सोहळा, हनिमून उरकल्यानंतर दत्तूचे आणखी काही प्री वेडिंग फोटोशूटचे अनसीन फोटोस समोर आले आहेत. (Dattu More Unseen Photoshoot)

यांत दत्तू आणि त्याच्या पत्नीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय. दत्तूच्या या फोटोशूटवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
