शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हा केवळ अपघात नसून हत्याच…”, ‘अनुपमा’ सेटवरील लाईटमनच्या मृत्यूप्रकरणी मोठा वाद, नुकसान भरपाईचीही मागणी

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 19, 2024 | 11:26 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
The All India Cine Workers Association demanded justice in the death of Lightman who suffered shock on the sets of the Hindi serial Anupama.

‘अनुपमा’ या हिंदी मालिकेच्या सेटवर शॉक लागून झालेला लाईटमनचा मृत्यू, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने न्यायाची केली मागणी

‘अनुपमा’ ही स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत टॉपवर असते. त्यामुळे ही मालिका कायमच चर्चेत असते. पण नुकतच या मालिकेच्या सेटवर एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये सेटवरील एका असिस्टंट लाईट मॅनचा मृत्यू झाला होता. गुरुवारी, १४ नोव्हेंबर रोजी ‘अनुपमा’च्या सेटवर असिस्टंट लाइटमनला विजेचा धक्का लागला. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावर आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने कारवाई करत मृत पावलेल्या व्यक्तीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. (Anupama Serial Set Lightman Death)

याप्रकरणी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे . त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून त्याची प्रत X वर टाकण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता सेटवरील उपकरणे खराब असल्याने हा अपघात झाल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे विजेचा धक्का बसला. या घटनेनंतरही मध्यरात्रीपर्यंत शूटिंग सुरु राहिले आणि मग दुसऱ्या दिवशीही पुन्हा नेहमीच्या हे शूटिंग सुरु झाले. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी सांगितले की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Shocking Negligence Exposed!

The Tragic Death of a 32-year-old Worker on the Shooting Set of Anupamaa Serial due to Electrocution isn’t an Accident—it’s Institutionalized Murder caused by Greed and Negligence of Producers, the Poduction House, and the Channel |

Despite the… pic.twitter.com/pMiVNMRstv

— All Indian Cine Workers Association (@AICWAofficial) November 18, 2024

आणखी वाचा – सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

या संपूर्ण प्रकरणी निर्माते मृत व्यक्तीची ओळख उघड करण्यास तयार नाहीत. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, सुरेश गुप्ता यांनी झूम टीव्हीला सांगितले की, “प्रोडक्शन हाऊस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. काही प्रोडक्शन हाऊस आणि चॅनेल्स थोडे पैसे वाचवण्यासाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करत नाहीत”. तसंच हा केवळ एक अपघात नसून निर्मात्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेली ही एक प्रकारची हत्याच असल्याचा दावा ‘एआयसीडब्ल्यूए’ने केला आहे.

आणखी वाचा – मित्रांचा कल्ला, भावनिक क्षण अन्…; लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रसाद-अमृताने पहिल्यांदाच शेअर केला Unseen Video

दरम्यान, ‘एआयसीडब्ल्यूए’ने मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याचीदेखील मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी ‘अनुपमा’ आणि इतर सहयोगी प्रोडक्शनच्या सेटवरील शूटिंग पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगित करण्याची मागणीदेखील केली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी नेमका काय निकाल लागणार? हा खरंच निष्काळजीपणा होता का? हे लवकरच कळेल.

Tags: Anupama Hindi SerialAnupama Serial Set Lightman Deathserial news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Ayushmann Khurrana In Concert

Video : कॉन्सर्टमध्ये चाहत्याने आयुष्मान खुराणावर उडवले पैसे, गाणं थांबवून फटकारलं, म्हणाला, "हेच पैसे तुम्ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.