रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अडकणार लग्नबंधनात, प्री-वेडिंग शूटसह मेहंदी समारंभाची झलक समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 15, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 Nikhil Rajeshirke Wedding 

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अडकणार लग्नबंधनात, प्री-वेडिंग शूटसह मेहंदी समारंभाची झलक समोर

 Nikhil Rajeshirke Wedding  : मराठी सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळाली. यंदाच्या वर्षात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकलेले पाहायला मिळाले. एकामागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळालं. प्रथमेश परब, शुभंकर एकबोटे, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश परब, ही कलाकार मंडळी यावर्षी लग्नबंधनात अडकली. यापाठोपाठ आता आणखी एक कलाकार विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाला आहे. मराठी सुप्रसिद्ध अभिनेता लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. हा अभिनेता म्हणजे अभिनेता निखिल राजेशिर्के.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील स्पर्धक व लोकप्रिय मराठी अभिनेता निखिल राजेशिर्के वैयक्तिक आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात करत असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. शिवाय त्याने प्री-वेडिंगचे फोटो शेअर करत लग्नबंधनात अडकणार असल्याची चाहूल दिली.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : ‘पारू’ मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री, दिसणार ‘ही’ अभिनेत्री, किर्लोस्कर कुटुंबात वादळ म्हणून येणार का?

View this post on Instagram

A post shared by chaitrali more (@travellingmascara)

अभिनेत्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो रिपोस्ट करण्यात आला आहे. ही स्टोरी पाहून तो लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये मेहंदी लावतानाचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात त्याच्या लग्नाला फक्त तीन दिवस बाकी आहेत, असं म्हटलं आहे. निखिल चैत्राली मोरे हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाआधी निखिल व चैत्रालीने वेस्टर्न अंदाजात प्री-वेडिंग शूट केलं. या फोटोशूटसाठी निखिलने काळा सूट तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने लाल रंगाची साडी नेसली होती. दोघांचा हा वेस्टर्न अंदाज अधिक लक्ष वेधून घेत होता.

आणखी वाचा – चार वर्षांनी शशांक-मृणाल यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष, चाहतेही खुश

निखिलने यंदाच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा उरकला होता. त्याच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘रंग माझा वेगळा’, ‘अजूनही बरसात आहे’, या मालिकांमधून निखिलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याशिवाय निखिल ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाला होता. मात्र पहिल्याच आठवड्यात तो एलिमिनेट झाला होता.

Tags: marathi actorNikhil RajeshirkeNikhil Rajeshirke Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
maheep kapoor met sanjay kapoor

अनिल कपूरच्या छोट्या भावाच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा, लग्नापूर्वी 'या' अभिनेत्यासह वन नाइट स्टँड केला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.