maheep kapoor met sanjay kapoor : बॉलिवूड अभिनेते संजय कपूर आणि महीप कपूर यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक कार्यक्रम व पार्ट्यांमध्ये हे कपल एकत्र दिसले आहे. संजय कपूरची पत्नी महीप कपूर ‘फॅब्यूलस लाइव्ह्ज व्हर्सेज बॉलीवूड वाईव्ह्ज’ या शोसाठी ओळखली जाते. फार कमी लोकांना महीप व संजय यांच्या लव्ह स्टोरीबद्दल ठाऊक असेल. नुकताच महीप कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने भाष्य केलं आहे. महीपनेच एका मुलाखतीत सांगितलं की, ती मद्यधुंद अवस्थेत संजय व त्याच्या कुटुंबाला भेटली होती. ती संजयला वन-नाइट स्टँडसाठी भेटली आणि नंतर त्यांनी लग्न केलं, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महीप कपूरने एक गुपित उघड केले आहे जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मुलाखतीदरम्यान महीपने लग्नापूर्वीच्या त्यांच्या अफेअरबद्दल सांगितले. फसवणूक करुनही संजय कपूरने तिला कसे सांभाळून घेतले हे तिने या मुलाखतीदरम्यान सांगितले. महीपने सांगितले की, लग्नापूर्वी तिने एका अभिनेत्याबरोबर वन नाइट स्टँड केला होता. हे माहीत असूनही संजय कपूरने तिच्याशी लग्न केले.
आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अडकणार लग्नबंधनात, प्री-वेडिंग शूटसह मेहंदी समारंभाची झलक समोर
महीपच्या या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसला. मात्र, महीपने त्या अभिनेत्याचे नावही उघड केले. तिने सांगितले की हा अभिनेता दुसरा कोणी नसून संजय कपूर आहे. महीपने सांगितले, “आमचे नाते सोपे होते. ज्याच्याबरोबर मी नाईट स्टँड केला त्याच्याशी नंतर लग्न करावे लागेल याची मला कल्पना नव्हती. मी त्यांच्या पक्षातही प्रवेश केला. मी पूर्ण नशेत होते. यादरम्यान मी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. तुम्ही सर्व माझ्या कुटुंबाला ओळखता. अनिल, सुनीता, श्रीदेवी”.
ती पुढे म्हणाली की, “वन नाईट स्टँडबद्दल कळल्यानंतरही संजयने मला स्वीकारले. की काय सून आहे, असे त्याचे कुटुंबीय म्हणाले. त्यांनी माझे मोकळ्या मनाने स्वागत केले”. संजय कपूर यांनी, “मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. बघ आपण लग्न करतोय”, इतकंच म्हटलं. लग्नाच्या प्रस्तावानंतर महीप व संजय एकमेकांना ५ वर्षे डेट करत होते. त्यांनी नाईट क्लबमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, “आम्ही १९०० नाईट क्लबमध्ये पार्टी केली होती. त्यावेळी आम्ही नशेत होतो. आम्ही पार्टी करत होतो. तो म्हणाला, ‘आपण लग्न करतोय’. मी दारू पितानाच म्हटले ‘ठीक आहे.’ एवढंच. आम्ही इन्स्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी गुडघ्यावर बसून प्रपोज वगैरे केलं नव्हतं”.