रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अजितदादा म्हणाले तिजोरीत खडखडाट पण…”, मराठी कलाकारांच्या पेन्शनवरुन सविता मालपेकरांचं मोठं विधान, म्हणाल्या, “लाज वाटते की…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 15, 2024 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Savita Malpekar made a statement mentioning Deputy Chief Minister Ajit Pawar on the pension of Marathi artists

मराठी कलाकारांच्या पेन्शनवरुन सविता मालपेकर यांचं मोठं विधान, अजित पवारांचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाल्या?

मराठी मालिका, नाटक व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर. आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘मुळशी पॅटर्न’, ‘पांडू’, ‘काकस्पर्श’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री सविता मालपेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. नुकतंच त्यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कलाकारांच्या ग्रेडवर तसंच त्यांना मिळणाऱ्या पेन्शनवर आपलं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर सविता यांनी मराठी इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा मिळण्याबद्दलही भाष्य केलं. (Savita Malpekar on Marathi Artist Pension)   

यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “इथे कोणत्याही पक्षाचा संबंध नाही. तेव्हा (उद्धव ठाकरे) यांच्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आम्ही काही मंडळी अजितदादांकडे गेलो होतो. तेव्हा आपल्या मराठी इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा नाही याबद्दल विचारायला गेलो होतो. तसंच कलाकारांच्या पेन्शनसाठी गेलो होतो. नाट्यपरिषदेचा एक पदाधिकारी अमित देशमुख सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्या पेन्शनसाठी विचारायला गेला होता. तेव्हा त्याने सांगितलं की मी त्यांना A ग्रेड, B ग्रेडनुसार कलाकारांना पेन्शन मिळाले पाहिजे असं म्हटलं. यावर मी त्यांना असं म्हटलं की ही ग्रेड ठरवणारा तू कोण आहेस? वर्गवारी कसली करता, जर द्यायचे असतील तर सरसकट द्या”.

आणखी वाचा – Video : भाऊ कदम यांनी गाडी थांबवून घेतली चाहत्यांची भेट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “देव माणूस…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “माझं म्हणणं असं आहे की जे स्वत:ला A ग्रेडचे कलाकार समजतात त्यांनी पेन्शन घ्यावीच का? त्यांना गरज नाही मग त्यांना दहा हजार रुपये कशाला पाहिजेत. याच मागणीसाठी आम्ही अजितदादांकडे गेलो आणि सांगितलं की कलाकारांची ही ग्रेड बंद करा. ग्रेड ठरवणारे तुम्ही आम्ही कोण आहोत? एकतर १,३०० आणि २,७०० रुपये देत आहात आणि या पैशात चार दिवसांची औषधे पण येणार नाहीत. त्या वृद्ध कलाकारांना निदान इतकी पेन्शन तरी द्या, ज्यात त्यांची महिन्याचे औषधे येतील”.

आणखी वाचा – परदेशातही मुग्धा-प्रथमेश घेत आहेत भारतीय पदार्थांचा आस्वाद, खास फोटो शेअर करत म्हणाले, “कार्तिकी एकादशीच्या दिवशी…”

यापुढे सविता यांनी असं म्हटलं की, “मी अजित दादांना म्हटलं की, ‘किमान २० हजार रुपये तरी द्या’. यावर अजित दादा असं म्हणाले की, ‘खरंच आम्हाला लाज वाटते की, इतकी कमी पेन्शन मिळते पण तिजोरीत खडखडाट आहे. मी कबूल करु शकत नाही. पण यापेक्षा कमी देणार नाही हे सांगतो’. त्यानंतर २०२१ च्या  अध्यायदेशात सर्वांना सरसकट पेन्शन देण्याचे नमूद करण्यात आले”.      

Tags: marathi actresssavita malpekarSavita Malpekar on Marathi Artist Pension
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
radhika merchant-ambani career plan

अनंत अंबानीबरोबरच्या लग्नानंतर चार महिन्यांनी कामावर परतली राधिका मर्चंट, करिअर प्लॅनही केला शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.