शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डोळ्यांवर, हातावर जखमा घेऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली होती ऐश्वर्या राय, अभिनेत्रीची ‘ही’ अवस्था पाहून नेटकरीही थक्क, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 14, 2024 | 12:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Rai 

डोळ्यांवर, हातावर जखमा घेऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली होती ऐश्वर्या राय

Aishwarya Rai  : ऐश्वर्या राय बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, मात्र ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत असून ऐश्वर्या-अभिषेक बच्चन वेगळे झाल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या दररोज कानावर येत आहेत, परंतु दोघांनीही अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या दरम्यान, अभिनेत्रीबरोबरची एक जुनी घटना व्हायरल होत आहे, जेव्हा ऐश्वर्या एका कार्यक्रमात तिच्या हाताला आणि डोळ्याला दुखापत घेऊन पुरस्कार घेण्यासाठी पोहोचली होती. तेव्हा अभिनेत्रीची अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

अभिनेत्रीबाबत घडलेली ही घटना २००० सालची आहे. त्यावेळी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटात सलमान खान देखील होता आणि ऐश्वर्या राय त्याला डेट करत होती. ऐश्वर्याच्या नावाची घोषणा होताच ती पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर पोहोचली. ऐश्वर्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण अवार्ड घेण्यासाठी पोहचलेल्या ऐश्वर्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती आणि हाताला दुखापत झाली होती. डोळ्याची दुखापत लपवण्यासाठी ऐश्वर्याने गॉगल घातला असला तरी दुखापत स्पष्ट दिसत होती.

आणखी वाचा – Tharla Tar Mag Serial : अर्जुनने सायलीची इच्छा केली पूर्ण, जेलमधून मधुभाऊंची सुटका करत दिलं खास सरप्राइज, मालिकेत नवं वळण

पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्याने तिच्या आई-वडिलांचे आभार मानले आणि तिच्या अवस्थेचे कारणही सांगितले. ऐश्वर्या म्हणाली होती, “एक आठवड्यापूर्वी मी पडली होते. अपघात झाला. मी घसरले आणि माझ्या घराच्या बाहेरच्या पायऱ्यांवरुन खाली पडले, पण मी देवाचे आणि माझ्या पालकांचे आभार मानते की, माझ्याबरोबर कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, एकही हाड मोडले नाही”.

आणखी वाचा – मावशी झाल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दाखवली भाच्याची पहिली झलक, फोटो पोस्ट करत म्हणाली, “काय भावना…”

ऐश्वर्या पुढे म्हणाली, “लोक म्हणाले आज तू असा लूक का घेऊन जात आहेस? पण मला असे म्हणायचे आहे की मला माझ्या प्रेक्षकांचे आणि या चित्रपटसृष्टीचे आभार मानण्याची ही संधी मिळाली आहे. त्यांच्यामुळेच मी इथे मंचावर आले आहे”. ऐश्वर्याबरोबर घडलेली ही घटना सध्या पुन्हा चर्चेत आली असून अभिनेत्रीचा अवार्ड घेण्यासाठीचा लूकही व्हायरल होत आहे.

Tags: AISHWARYA RAIAishwarya Rai Abhishek Bachchan Newsbollywood news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
ankita lokhande on vicky jain

नवऱ्याला सतत त्रास देते अंकिता लोखंडे, फोटो शेअर करत उडवली खिल्ली, पोस्ट व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.