शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tharla Tar Mag Serial : अर्जुनने सायलीची इच्छा केली पूर्ण, जेलमधून मधुभाऊंची सुटका करत दिलं खास सरप्राइज, मालिकेत नवं वळण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 14, 2024 | 12:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharla Tar Mag Serial Update

अर्जुनने सायलीची इच्छा केली पूर्ण, जेलमधून मधुभाऊंची सुटका करत दिलं खास सरप्राइज

Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, एकीकडे दिवाळी सणानिमित्त सुभेदार कुटुंबात आनंद पाहायला मिळत असतो. सगळेजण दिवाळीची जय्यत तयारी करताना दिसतात. त्या किल्लेदार कुटुंबातही रविराज, प्रतिमा यंदाची दिवाळी प्रतिमा असल्याने जोरदार साजरी करायचं ठरवतात. कल्पना सायलीच्या मदतीने फराळाचा चांगला घाट घालते. सगळेच जण खूप आनंदी असतात. लक्ष्मीपूजनादिवशी अर्जुन महत्त्वाचं काम आहे सांगून घराबाहेर पडतो. तर बराच वेळ अर्जुन घरी परतला नसल्याने सायली काळजी व्यक्त करु लागते. ती कल्पनालाही अर्जुन कुठे गेला आहे याबाबत विचारते मात्र तिलाही काहीच माहित नसल्याचं ती सांगते.

त्याच वेळेला अर्जुन एका अशा व्यक्तीला घरात घेऊन येतो ज्याने सायलीचे डोळे पाणावतात. मधु भाऊंना समोर पाहून सायलीला फारच आनंद होतो. थेट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मधु भाऊंना जेलमधून सुटलेलं पाहून सायली खूप खुश होते. ती त्यांना जाऊन घट्ट अशी मिठी मारते. अखेर अर्जुनने सायलीसाठी काहीपण असं म्हणत मधु भाऊंची जेलमधून सुटका केली असल्याचे पाहायला मिळतंय. सायलीने अर्जुनवर दाखवलेला अविश्वास हा खोटा असल्याचं अर्जुनने सिद्ध करुन दाखवलेलं पाहायला मिळतंय.

आणखी वाचा – मावशी झाल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दाखवली भाच्याची पहिली झलक, फोटो पोस्ट करत म्हणाली, “काय भावना…”

मालिकेच्या भागात असं पाहायला मिळते की, मधुभाऊ जेलमधून सुटून आले आहेत, यावर सायलीचा विश्वास बसत नाही. मी परत न जाण्यासाठी आलोय आणि जावईबापूंनी मला बेलवर सोडवलंय, असं मधुभाऊ सायलीला म्हणतात. माझ्याकडून जी चूक घडली होती ती सुधारावी लागणारच होती ना मला, असं अर्जुन सायलीला सांगतो. यावेळी मधुभाऊ सायलीला म्हणतात, ‘तुझ्यापाठीशी तुझा नवरा असताना, कशाला घाबरायचं’. बाप-लेकीची भेट दिवाळीच्या दिवशी व्हावी हीच देवी आईची इच्छा होती, असं कल्पना म्हणते.

आणखी वाचा – Video : समुद्रकिनारी फुग्यांचे डेकोरेशन, पार्टी अन्…; बिपाशा बसू व करण सिंग ग्रोव्हरने थाटात साजरा केला लेकीचा दुसरा वाढदिवस, फोटो व्हायरल

यानंतर अर्जुन सायलील म्हणतो, ‘मी तुम्हाला वाटतो इतका वाईट नाहीये’, असं अर्जुन सायलीला सांगतो आणि कान पकडून तिची माफी मागतो. यानंतर सायली, अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि रडते. आता सायली व अर्जुन यांच्यातील प्रेम फुलणार का?, हे सारं पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialTharla Tar Mag SerialTharla Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bollywood actor Salman Khan ex-girlfriend Somy Ali attacked and her hand fractured.

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीवर जीवघेणा हल्ला, हात फ्रॅक्चर, म्हणाली, “खूप वेदना...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.