Bipasha Basu Karan Singh Grover Daughter Birthday : बिपाशा बसू व करण सिंग ग्रोवर यांची मुलगी देवी हिचा वाढदिवस समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. १२ नोव्हेंबरला देवी २ वर्षांची झाली असून बिपाशाने या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक शेअर केली आहे. बिपाशा बसू व करण सिंग ग्रोव्हर त्यांच्या छोट्या देवदूताचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट बीचवर पोहोचले. बिपाशा व करणने समुद्र किनाऱ्यावर आपल्या मुलीसाठी एक सुंदर पार्टीही आयोजित केली होती, जिथे तिच्या मुलीने खूप मजा केली.
बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, देवी वाढदिवसाच्या ड्रेस आणि बॅलेरिना शूजमध्ये समुद्रकिनार्यावर नाचताना आणि मजा मस्ती करताना दिसत आहे. समुद्रावर फुग्यांची अप्रतिम सजावट पाहायला मिळत आहे आणि एक मजेदार रंगीबेरंगी केक देखील तेथे पाहायला मिळतोय. समुद्र किनाऱ्यावर देवी वाळूमध्ये खेळताना आणि कॅमेऱ्याकडे पाहून हसतानाही दिसत आहे. बिपाशाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हमारी कब (शावक) – सिम्बा २ वर्षांची झाली आहे”. हकुना मटाटा हे आमचे जीवन आहे.
याशिवाय बिपाशा बसूने तिच्या मुलीबरोबर वाढदिवस साजरा करताना अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये देवी केक कापताना दिसत आहे. ही छायाचित्रे शेअर करताना तिने लिहिले आहे की, “फक्त आनंद”. याआधी बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देवीचा आणखी एक सुंदर व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये देवी आईच्या मांडीवर असून अभिनेत्रीच्या टी-शर्टवर तिचे नाव लिहिलेले आहे. तर करणच्या टी-शर्टवर ‘देवीचे पापा’ असं छापलेलं आहे.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये देवी वाढदिवसाच्या ड्रेसमध्ये ‘आय लव्ह यू मम्मी’ गाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना बिपाशाने लिहिले आहे की, ‘इतक्या लवकर वेळ कसा निघून गेला कळत नाही. आज देवी २ वर्षांची झाली आहे आणि ती खूप आनंदी आहे. तिच्यावर खूप प्रेम आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. दुर्गा दुर्गा”. या सर्व पोस्टवर बिपाशाच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी तिच्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा बसू शेवटची ‘अलोन’मध्ये दिसली होती आणि तेव्हापासून ती चित्रपटांमधून ब्रेकवर आहे. करण सिंग ग्रोव्हर शेवटचा ‘फाइटर’मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणबरोबर दिसला होता. तो अंकुश भट्टच्या ‘फिरकी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, ज्यात जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश आणि के के मेनन यांच्याही भूमिका आहेत.