शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंध चाहतीने गायलं गाणं, उत्कर्ष शिंदेने शेअर केली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, “माइकला हात लावताच…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 13, 2024 | 4:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi singer and actor Utkarsh Shinde give chance to sing to a blind girl he posted a special post about it on social media.

गायक उत्कर्ष शिंदेने अंध मुलीला दिली गाण्याची संधी, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

मराठी सिनेसृष्टीत आपल्या आवाजाने गेली कित्येक वर्षे शिंदे घराणे राज्य करत आहे. मराठी संगीत विश्वामध्ये या शिंदे घराण्याचा दबदबा त्यांची तिसरी पिढी कायम राखताना दिसते. आनंद शिंदे यांचे दोन्ही सुपुत्र उत्कर्ष आणि आदर्श यांचा आवाज सध्याच्या तरुणाईला नेहमीच वेड लावतो. यापैकी उत्कर्ष हा पेशाने डॉक्टर आहे. मात्र ‘बिग बॉस मराठी’मुळे त्याला त्याचा स्वतंत्र चाहता वर्ग मिळाला. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात उत्कर्षने टॉप ५ मध्ये मजल मारली होती. त्यानंतर तो ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेत अभिनय करतानादेखील दिसला. आपल्या संगीताने व गायकीने चर्चेत राहणारा हा उत्कर्ष सोशल मीडियावरही सक्रीय असतो. (Utkarsh Shinde Instagram Post)

सोशल मीडियावर उत्कर्ष अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उत्कर्षने एका अंध मुलीमधील गाण्याचे टॅलेंट ओळखून तिला गाण्याची संधी दिली आहे. उत्कर्षने यासंबंधित इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “अंधारात माणसे धडपडतात, अडखळतात. पण तू मात्र अंधाराला भेदून लखलखणाऱ्या सूर्यासारखी एक एक सूर लावत होतीस. तुला दिसत जरी नसलं, तू फक्त अंधाराच पाहिलास हे जरी खर असलं तरीही तूझे सूर त्यातील ऊर्जा वातावरण प्रकाशमान करतात”.

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi : पायाला लागल्याचे केदारचे खरं सत्य सर्वांसमोर येणार, नेत्रा करणार मोठा खुलासा, काय असेल नेमकं कारण?

यापुढे उत्कर्षने असं म्हटलं आहे की, “मी तुमची फॅन आहे. मला तुम्हाला भेटायचं आहे. मुंबई ते पुणे एकटी प्रवास करुन मला भेटायला कार्यक्रम ऐकायला आलेली तू. बालगंधर्व रंगमंच्यावरील नेत्रहीन मुलांच्या रांगेत बसलेली तू. मला तुमच्याबरोबर स्टेज वर गायचं आहे. ती तुझी इच्छा तेव्हा त्या गर्दीत जरी हुकली तरीही तुझा आवाज, सूर, तू मला कॉल करुन ऐकवलास आणि मी तेव्हाच निश्चय केला की, तुझ्या आवाजात गाणं रेकॉर्ड करणारच. रिकॉर्डिंग स्टुडीओ, माईक, हेडफोन कधीच न पाहिलेली निरागस मुलगी जेव्हा स्टुडिओत येते आणि हाताने माइक टच करत अंदाज घेत पूर्ण गाणं उत्तम रित्या एका प्रख्यात मुरलेल्या गायिकेसारखं गाते”.

आणखी वाचा – अतुल कुलकर्णींच्या गाजलेल्या ‘बंदिश बँडिट्स’ सीरिजचा नवीन सीझन चाहत्यांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार?

यापुढे उत्कर्ष असं म्हणतो की, “बघणाऱ्याला अचंबित होतंच, पण ऐकताना वाटतं सरस्वती कंठात वसते तर ती अशी वसते. मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला तू न्याय दिलास. मी संगीतबद्ध केलेलं गीत मला जसं हवं तसंच तू गायली आहेस. आज तुझ्यासाठी गाणं बनवताना वाटतं आपल्या कलेचं सार्थक झालं हीच भावना मनात आहे. अर्चना तुझ्या स्वरांनी माझं गाण मोठं नक्कीच झालं. खूप मोठी हो बाळा. हा भाऊ सदैव बरोबर आहे”.   

Tags: tkarsh Shinde Instagram PostUtkarsh Shinde give Blind Girl Singing OpportunityUtkarsh Shinde News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerla Serial Updates Leela finding way to rescue aj from the jail

Navri Mile Hitlerla : एजेंना तुरुंगात टाकण्याचा श्वेताचा जाणीवपूर्वक प्रयत्न, लीला नवऱ्याला निर्दोष सिद्ध करु शकेल का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.