सध्या ‘बिग बॉस १८’ खूप चर्चेत आहे. हा शो सुरु झाल्यापासूनच त्यामध्ये मोठे ट्विस्ट आलेले पाहायला मिळतात. या पर्वामध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश असलेला बघायला मिळतो. अभिनेता विवियन डिसेनादेखील यामध्ये सहभागी झाला आहे. या कार्यक्रमामध्ये आल्यापासूनच तो मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला आहे. आठ वर्ष मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर तो ‘बिग बॉस’ च्या निमित्ताने तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर आला. गेल्या दोन आठवड्यांपासून तो बिग बॉस’च्या घरावर राज्य करताना दिसत आहे. त्याच्याबद्दल सोशल मीडियावर त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील होताना दिसते. मात्र आता एका नवीन प्रकरणामुळे विवियन चर्चेत आला आहे. (vivian dsena troll)
विवियनला ‘बिग बॉस’मुळे अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. अशातच आता विवियनच्या दातांवर व त्याच्या दिसण्यावरुन चर्चा सुरु झाली असून त्याला ट्रोलदेखील करण्यात येत आहे. विवियनचे दात बघून तो तंबाखू खात असल्याचे काही जण म्हणत आहेत तर अनेक जण त्याला या पर्वाचा विजेतादेखील म्हणत आहेत. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी त्याची पहिली पत्नी नुरान अली समोर आली आहे.
The man that imports his Tobacco and uses a certain brand only because it's organic tobacco will go and consume these things !!..
— Nouran Aly (@NouranAly01) November 9, 2024
What is wrong with ppl seriously 🤣🤣
The problem is they have zero sense n their talk, just carrying one word and spreading it stupidly and Blindly https://t.co/ePYEavORIY
विवियनची पत्नी नुरान म्हणाली की, “ही व्यक्ती त्याचा स्वतःचा तंबाखू घेऊन आला आहे आणि तो एका निश्चित ब्रॅंडचा तंबाखू खातो कारण तो ऑर्गेनिक आहे. तो खाणारच. लोकांना झालंय तरी काय? लोकांना काही समजतच नाहीये. ते फक्त एक शब्द पकडतात आणि डोळे बंद करुन आणि विचार न करता सोशल मीडियावर सगळं पसरवतात”.
यानंतरदेखील लोकांनी विवियनला ट्रोल केलं आहे. सिगरेट, दारु व तंबाखूचे सेवन करुन विवियनने स्वतःचे नुकसान करुन घेतले आहे. स्वतःची फजिती करुन घेतली आहे. तसेच ‘बिग बॉस’ पण खूप रट्याळ झाले आहे. यावरदेखील नुरानने उत्तर देत लिहिले की, “तुम्ही त्याच्याबरोबर राहत आहात की आमच्याबरोबर? कारण तो या सगळ्या गोष्टी करतो. तुम्ही फक्त मत मांडत आहात. इथे कोणीही येऊन काहीही बोलू शकतं. बोलण्याचे स्वातंत्र्य आहे असे सांगून काहीही बोलू शकतात”. दरम्यान विवियन सध्या खूप चर्चेत आला आहे.