शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“१२-१३ वर्षांचा असतानाचा ड्रग्ज घ्यायला लागलो आणि…”, स्मिता पाटील यांच्या लेकाचं मोठं भाष्य, म्हणाला, “कौटुंबिक परिस्थितीमुळे…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 11, 2024 | 1:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
late marathi actress Smita Patil son actor Prateik Babbar opened up about his drug addiction and his struggle to come out of it.

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरचा ड्रग्ज वापराबद्दल आणि त्यातून बाहेर येण्याच्या संघर्षाबद्दल भाष्य

चित्रपट जगतात अंमली पदार्थांचा व्यापार प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. ड्रग्जच्या प्रकरणात चित्रपटातील कलाकारांची नावे येणे ही आता सामान्य गोष्ट राहिलेली नाही. इतकंच नाही तर अनेक कलाकारांनी ते एकेकाळी ड्रग्ज घेत असल्याचं उघडपणे जाहीर केलं आहे. अशातच आता एका अभिनेत्यानेही त्याच्या ड्रग्ज वापराबद्दल भाष्य केलं आहे आणि हा अभिनेता म्हणजे  प्रतीक बब्बर. प्रतीक हा दिवंगत दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील व अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आहे. खूप कमी वयातच त्याला हे व्यसन जडलं होतं. या व्यसनातून कालांतराने तो बाहेर पडला. प्रतीक २०१३ मध्ये ड्रग्जच्या व्यसनातून मुक्त झाला. (Prateik Babbar On Drugs)

प्रतीक बब्बरने ड्रग्जच्या व्यसनाशी लढा देण्याबद्दल सांगितले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतरच त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केल्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. प्रतीकला इंडस्ट्रीत १६ वर्षे झाली आहेत. मात्र इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच ड्रग्जचं व्यसन होतं, असं प्रतीकने सांगितलं. याबद्दल बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला की, “लोकांना वाटतं की, ‘हा फिल्म इंडस्ट्रीत आला, त्याला प्रसिद्धी आणि पैसा मिळाला आणि मग त्याने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली’ पण तसं काही नाही. माझ्याबाबतीत हे खरं नाही. मी १२-१३ वर्षांचा होतो, तेव्हपासून मी ड्रग्ज घेत होतो”.

View this post on Instagram

A post shared by prateik patil babbar (@_prat)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मैत्रिणींसह केली Bride To Be Party, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या…”

यापुढे तो असं म्हणाला की, “दुर्दैवाने, माझं संगोपन वेगळ्या पद्धतीने झालं आणि माझी कौटुंबिक परिस्थिती थोडी गुंतागुंतीची होती. त्यामुळे मी ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. चित्रपटांमधील प्रसिद्धी आणि पैसा मला ड्रग्जकडे घेऊन गेलं असं नाही. मी लहानपणापासूनच ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. ड्रग्जचा माझ्यावर परिणाम झाला आणि अजूनही होतो. खासकरुन नात्यांवर परिणाम होतो. ड्रग्जचा संबंध आघाताशी (ट्रॉमा) आहे. जोपर्यंत तुम्ही ट्रॉमातून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम नात्यांवर आणि आयुष्यातील इतर गोष्टींवर होत राहील”.

आणखी वाचा – Video : भावासाठी रितेश देशमुख प्रचाराच्या रिंगणात, झापूक झुपूक स्टाइलने केलं भाषण, उपस्थितांच्या टाळ्या, शिट्ट्या अन्…

यापुढे त्याने यातून बाहेर येण्याबद्दल त्याच्या प्रियसीचे आभार मानले. याबद्दल् तो असं म्हणाला की, “आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला गोष्टी चांगल्या करण्यासाठी काम करावं लागतं. मीही अनेक वर्षांपासून ते करत आहे. माझी होणारी पत्नी प्रिया बॅनर्जी मला सुधारण्यासाठी खूप मदत करत आहे. तिला काहीच बदलण्याची गरज नाही, ती परफेक्ट आहे; मात्र आम्ही एकमेकांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतोय. आयुष्य हे असंच आहे आणि पुढे जावंच लागतं”.  

Tags: Late Actress Smita Patil Son Prateik BabbarPrateik Babbar Drug AddictionPrateik Babbar On Drugs
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Actor Mukesh Khanna shared a special video and hinted that the popular 1990s serial Shaktimaan will come retrun

'शक्तिमान' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, टीझरही प्रदर्शित, नव्या रुपात बच्चे कंपनींचं मनोरंजन होणार, व्हिडीओ एकदा पाहाच

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.