शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पूजा सावंतचा यंदाचा पहिला दिवाळी पाडवा नवऱ्याशिवाय, आठवणीत शेअर केली पोस्ट, म्हणाली, “तुझी आठवण…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 3, 2024 | 12:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Actress Pooja Sawant celebrated her first Diwali Padwa this year without her husband and shared a post in his memory

पूजा सावंतचा यंदाचा लग्नानंतरचा पहिला पाडवा नवऱ्याशिवाय, त्याच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली...

सध्या सगळीकडे दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी रोशनाई, लावलेले कंदिल, रंगीबेरंगी रांगोळ्या दिवाळी सणाचे सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. अशातच नुकताच दिवाळी पाडवा साजरा झाला. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. (Pooja Sawant First Diwali Padwa)

लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा सण खास असतो. यंदा अनेक मराठी कलाकारांनी त्यांचा लग्नानंतरचा पहिला पाडवा साजरा केला. अभिनेत्री गौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर, अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके, सुरुची अडारकर व अभिनेता पीयूष रानडे यांसह अभिनेत्री पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यानी एकमेकांशी लग्न गाठ बांधली. त्यामुळे अनेक मराठी कलाकारांसाठी यंदाचा पहिला दिवाळसण खास आहे. मात्र अभिनेत्री पूजा सावंतसाठी यंदाचा पहिला दिवाळसण काहीसा हिरमोड करणारा आहे. कारण लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळसणाला अभिनेत्री तिच्या नवऱ्याबरोबर नाही.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम ‘परदेसी गर्ल’ इरीनाने लाडक्या डीपी दादांबरोबर साजरी केली यंदाची भाऊबीज, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

त्यामुळे पूजाने आपल्या नवऱ्याच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळी पाडव्याला पूजा नवरा सिद्धेशबरोबर नसून त्याच्या आठवणीत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पूजाने असं म्हटलं आहे की, “सिद्धेश आज मला तुझी किती आठवण येत आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही”. तसंच आणखी एक स्टोरी पोस्ट शेअर करत “दिवाळी पाडवा सिद्धेश शिवाय” असं म्हटलं आहे. यामध्ये पूजा नवऱ्याच्या आठवणीत व्याकूळ झाली असून ती नवऱ्याला खूप मिस करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – स्वत:च्या वाढदिवशी शाहरुख खानचे प्रॉपर्टीच्या हिस्स्यांबद्दल मोठं भाष्य, म्हणाला, “सुहाना…”

दरम्यान, अभिनेत्री पूजा सावंत बुधवारी (२८ फेब्रुवारी २०२४) रोजी लग्नबंधनात अडकली. तिने शाही पद्धतीने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. पूजाने साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर चाहत्यांमध्ये लग्नाची खूप उत्सुकता होती, अखेर २८ फेब्रुवारी थाटामाटात तिचा लग्नसोहळा पार पडला.  

Tags: marathi actresspooja sawantPooja Sawant First Diwali Padwa After Marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
aai kuthe kay karte fame Actress Rupali Bhosle bought a new car and shared a special video on social media.

Video : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘आई कुठे...’ फेम अभिनेत्रीने घेतली आलिशान कार, सोशल मीडियावर शेअर केली खास झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.