राज्यात सर्वत्र दिवाळीचा माहौल आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक सेलिब्रिटी घर, गाडी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं पसंत करतात. घर, वाहन यासारखी महत्त्वाची खरेदी करताना अनेक जण साडेतीन मुहूर्तांना प्राधान्य देतात. गुढीपाडवा, अक्षय्य तृतिया व दसरा या तीन मुहूर्तासह दिवाळीचा पाडवा या मुहूर्तालाही मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. याच शुभमुहूर्तावर मराठीतील सुपसिद्ध अभिनेत्रीने नवीकोरी आलिशान कार खरेदी केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’ फेम संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले. (Rupali Bhosle New Car)
अभिनेत्री रुपाली भोसलेने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गाडी खरेदी केली असून या नवीन कार खरेदीची झलक तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. दिवाळीनिमित्त अभिनेत्रीने नवीन कार खरेदी केली आहे. रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती संपूर्ण कुटुंबासह कार खरेदी करायला गेल्याचे पाहायला मिळत आहेत. फटाके फोडत, गाडीची पूजा करत आणि केक कापत त्यांनी या कार खरेदीच्या दिवसाचे सेलिब्रेशन केल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
अभिनेत्रीच्या नवीन कारनिमित्त तिला मराठी मनोरंजन सृष्टीतीळ अनेक कलाकार व चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनंदन असं म्हटलं आहे. तसेच अनेकांनी तिला नवीन कारसाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत. “वाह खूप छान. अभिनंदन आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”, “तुमचा शून्यातून इथपर्यंतचा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे”, “खूप खूप अभिनंदन” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – पूजा सावंतचा यंदाचा पहिला दिवाळी पाडवा नवऱ्याशिवाय, आठवणीत शेअर केली पोस्ट, म्हणाली, “तुझी आठवण…”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचे नवीन घर घेतले. ठाण्यात आलिशान घर घेऊन आपली स्वप्नपूर्ती केली. अशातच आता तिने नवीन गाडीदेखील खरेदी केली आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष अभिनेत्रीसाठी खूपच छान आहे असं म्हणायला काही करक्त नाही. रुपालीने सुरुवातीच्या काळात संघर्ष करून आज एवढं मोठं यश मिळवलं आहे. गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम केल्यामुळे रुपाली आज छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.