शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आयुष्यातील हळवा क्षण…”, ‘शिवा’ला पुरस्कार मिळताच भावुक पोस्ट, स्टेजवरही रडली, म्हणाली, “सातत्याने काम…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 29, 2024 | 11:02 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva serial fame actress Purva Kaushik expressed her feelings on receiving the Zee Marathi Award 2024

झी मराठी अवॉर्ड २०२४ पुरस्कार मिळताच पूर्वा कौशिकची खास पोस्ट, भावना व्यक्त करत म्हणाली...

यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ हा पुरस्कार खऱ्या अर्थानं संस्मरणीय ठरला. कारण यंदा झी मराठी वाहिनीने २५ वर्ष पूर्ण केली. वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदाचा ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा तब्बल दोन दिवस पार पडला. या सोहळ्यात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यंदा वाहिनीचं आणि यावर सुरू झालेली पहिली मालिका ‘आभाळमाया’चं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करण्यात आलं. यावेळी सर्वोत्कृष्ट नायिका हा पुरस्कार अभिनेत्री पूर्वा कौशिकला मिळाला. तिच्या ‘शिवा’ मालिकेतील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने पूर्वाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Purva Kaushik On Zee Marathi Award 2024)

पूर्वाने पुरस्कार सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत आणि असं म्हटलं आहे की, “हे सगळं खूप जास्त भारावून टाकणारं आहे. एखादी गोष्ट सातत्याने करत राहणं आणि आपल्या कामात सातत्य असणं हे आपल्याला खूप काही देऊन जातं. मी बाकी आळशी असले तरी अभिनयाला माझे सातत्य होतं आणि यापुढे कायम असेल. याच सातत्यामुळे ‘शिवा’ ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त जवळची आणि मोठी घडली. झी मराठीची सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून मला सन्मान दिला. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचं चीज झाल्यासारखं वाटत आहे”.

View this post on Instagram

A post shared by Purva kaushik (@kaushikpurva14)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिकेची मृत्यूशी झुंज, पतीच्या निधनानंतर अवस्था वाईट, मुलाने सांगितलं, “परिस्थिती गंभीर…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “झी मराठीचं २५वे वर्ष आणि त्यात माझा सहभाग असणं हीच मुळात मोठी गोष्ट आहे. या सगळ्यासाठी झी मराठीचे खूप आभार आणि जगदंब प्रोडक्शनचे ही खूप खूप आभार. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात हळवा, भारावून टाकणारा, खुश करणारा क्षण आहे आणि मला तुम्ही हा अनुभव दिलात त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार. यासाठी मी कायम ऋणी असेन आणि असंच सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करत राहीन”.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या व्यावसायिकाला धक्का, कोटींची कार चोरी, सीसीटीव्हमध्ये दिसला संपूर्ण प्रकार

दरम्यान, अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आला. तसंच हा पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. आई-वडिलांच्या आठवणीत पूर्वाच्या डोळ्यांतून अश्रू वाहिले. यावेळे तिने आपल्या भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “मी आणि आई-बाबा जेव्हा हा सोहळा घरी बसून बघायचो. तेव्हा माझे आई-बाबा होते. त्यांची खूप इच्छा होती की, मला हा पुरस्कार मिळावा. पण आज ते जेव्हा मिळालं तेव्हा ते नाहीत. आज आई-बाबा असते तर त्यांना खूप छान वाटलं असतं”.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
sai pallavi get trolled

भारतीय सैन्यदलाची दहशतवाद्यांबरोबर केलेली तुलना साई पल्लवीच्या अंगलट, 'रामायण'मधून बॉयकॉटची मागणी, वाद पेटणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.