ओटीटीवरील ‘मिर्झापूर’ ही सीरज चांगलीच गाजली. या वर्षी या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता चौथा भाग कधी येणार याकडे दर्शकांचे लक्ष लागले आहे. अशातच आता ‘मिर्झापुर’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या लोकप्रिय सीरिजचा आनंद प्रेक्षकांना आता मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, मिळालेल्या माहितीनुसार, ‘मिर्झापूर’ आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सीरिजच्या निर्मात्यांनी चाहत्याना मोठी भेट दिली आहे. त्यांनी ‘मिर्झापुर द फिल्म’ अशी घोषणा करण्यात आली आहे. (mirzapur the film announment)
अभिनेता पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु यांची मुख्य भूमिका असणारा ‘मिर्झापूर द फिल्म’ २०२६ साली चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. फरहान अख्तरने नुकताच क्राइम थ्रीलरचा टीजर जारी केला आहे. हा टीजर आल्यापासून सगळेच जण उत्सुक दिसत आहेत. सोशल मीडियावर टीजर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “राडा पण मोठा असणार आणि पडदापण मोठा असणार, ‘मिर्झापुर द फिल्म’ लवकरच येत आहे”.
दरम्यान समोर आलेल्या टीजरमध्ये सुरुवातीला पंकज त्रिपाठी दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, “खुर्चीचं महत्त्व सगळ्यांनाच माहीत आहे. सगळ्यांनी आपापल्या खुर्चीवर बसून मिर्झापूर तुम्ही पाहिलाच असेल. पण यावेळी खुर्चीवरुन उठला नाहीत तर धोक्याचे आहे”. यानंतर अली फजल म्हणजे गुड्डू पंडितदेखील दिसून येत आहे, तो म्हणत आहे की, “बरोबर कालीन भय्या, जोखीम घेणे ही आमची खासियत आहे. आता सगळा खेळ बदलला आहे. मिर्झापुर काही तुमच्याकडे येणार नाही आता तुम्हालाच मिर्झापुरकडे यावं लागेल”. यानंतर मुन्ना भय्याची एंट्री होते. तो म्हणतो की, “हिंदी चित्रपटाचा मी हीरो आहे. मिर्झापुरच्या खुर्चीवर आता मीच राज्य करणार”.
हा चित्रपट २०२६ साली प्रेक्षकांच्या येणार आहे. टीजर समोर आल्यानंतर चाहत्यांनामध्ये उत्साहाचे वातावरण असलेले पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये विक्रांत मेस्सी कुठेही दिसून आला नाही.