टेलिव्हिजनवरील ‘कुबुल है’ या मालिकेतील सुरभी ज्योति ही अभिनेत्री घराघरात पोहोचली. ती नंतर अनेक मालिका व कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसून आली. अशातच आता अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. सुरभीने बॉयफ्रेंड सुमित सुरीबरोबर लग्नगाठ बांधली आहे. सुरभीच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले दडिसून येत आहेत. याआधी त्यांच्या हळदी ब मेहंदी समारंभाचे फोटोदेखील समोर आले आहेत. यामध्ये त्यांचे मित्रमंडळी तसेच कुटुंबातील सदस्य सामील झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे आता सुरभीनेही आयुष्याची नवीन सुरुवात करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. तिने स्वतःच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दलची कल्पना दिली आहे. (surbhi jyoti wedding)
लग्नानंतर सुरभीने सुमितबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत/ तसेच हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शुभ विवाह”. तिच्या या पोस्टवर टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी पसंती दर्शवली असून प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. लग्नाच्या वेळी सुरभीने लाल व पिवळ्या रंगाचा लहंगा परिधान केला होता. तसेच हातातील कलिरे, लाल चुडा. डोक्यावरील मांग टीका यामध्ये नवरीच्या वेशात सुरभी खूप सुंदर दिसत आहे. तसेच सुमितने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. दोघंही एकत्रित खूप सुंदर दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरभी व सुमित मार्च महिन्यात राजस्थान येथे लग्न करणार होते. मात्र ठिकाण निश्चित होत नसल्याने लग्न पुढे ढकलले गेले. त्यानंतर त्यांनी उत्तराखंड येथील जिम कॉर्बेटची निवड केली. समोर आलेल्या फोटोंमध्ये एका मोठ्या झाडाला सुंदररित्या सजवले गेलेले दिसून येत आहे. या झाडाखालीच सुरभी व सुमित यांनी सात फेरे घेतले.
लग्नाआधी 27 तारखेला दुपारी दोघांचा हळदी समारंभ पार पडला. याआधी शनिवारी त्यांचा मेहंदी समारंभ पार पडला यामध्ये सुरभीने पंजाबी पेहराव परिधा केला होता. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सुरभी व सुमितची ओळख २०१९ साली झाली. त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.