The Family Man 3 : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी माध्यमाची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक या सीरिजच्या आगामी सीझन्सची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दोन सीझन्सनत्र आता या सीरिजच्या तिसऱ्या सीजनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या दोन सीजनच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या सीझनबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे. या सीजनमध्ये अनेक नवीन कलाकारांचे चेहरे दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा लागून आहे. (The Family Man 3 Series Update)
सीरीज ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये आला होता. त्यानंतर २०२१ मध्ये निर्मात्यांनी या सीरिजचा दुसरा सीझन आणला. अशातच आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचीही चाहत्यांना आतुरता लागून राहिली आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या पहिल्या व दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनच्या अखेरीस तिसऱ्या सीझनबाबत हिंट देण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आणखी वाचा – अरमान मलिकने गुपचूप उरकलं चौथं लग्न?, मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्तीशीच जुळलं प्रेम, पायल-कृतिकाचं काय होणार?
फिल्मीबीटच्या रिपोर्टनुसार, अलीकडेच राज आणि डीके यांनी ‘द फॅमिली मॅन सीझन 3’ च्या रिलीजबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा दिग्दर्शक जोडीला फॅमिली मॅनच्या रिलीजच्या तारखेबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “अजूनही सीरजचे शूटिंग सुरु आहे. सीरिज शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात आली आहे. अजून काही शूटिंग बाकी आहे. प्रदर्शनाबात मला सांगण्याची परवानगी नाही. कारण ते कधी रिलीज होईल हा अॅमेझॉनचा निर्णय आहे. परंतु माझ्या मते पुढच्या वर्षी ही सीरिज प्रदर्शित होऊ शकते”.
आणखी वाचा – Video : मृण्मयी देशपांडेची महाबळेश्वरमधील घरात सुरु आहे धमाल, करणार स्ट्रॉबेरीची शेती, दाखवला संपूर्ण परिसर
दरम्यान, ‘द फॅमिली मॅन ३’चे दिग्दर्शन आणि निर्मिती राज आणि डीके या जोडीने केली आहे. तर या सीझनची कथा राज, डीके व सुमन कुमार यांनी लिहिली आहे. मनोज बाजपेयी व्यतिरिक्त ‘द फॅमिली मॅन सीझन 3’ च्या कलाकारांमध्ये प्रियमणी, शारीब हाश्मी आणि श्रेया धन्वंतरी यांचा समावेश असेल. काही वृत्तांनुसार, अभिनेत्री निम्रत कौरदेखील या सीरिजमध्ये एक दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे.