शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोसह नवऱ्याचाही गौरव, शिवानी रांगोळे व विराजसचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “घरी ट्रॉफी घेऊन जाताना…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 24, 2024 | 12:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Virajas Kulkarni and Shivani Rangole shared a special post on the occasion of receiving the award International Iconic Awards 2024

‘आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स २०२४’ हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णी यांची खास पोस्ट

मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णीने मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकत स्वतःची ओळख निर्माण केली. आज तो एक लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळेशी लग्नगाठ बांधली. शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. त्या दोघांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडते. विराजस आणि शिवानी यांनी दोन वर्षांपूर्वी नवरा-बायको म्हणून नव्या नात्याची सुरुवात केली. (Virajas Kulkarni and Shivani Rangole Award)

शिवानी व विराजस हे दोघे मनोरंजन क्षेत्रात आहेत. याआधी त्यांना वेगवेगळ्या भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. अशातच त्यांना नुकताच ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स २०२४’ हा पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराबद्दलची खास पोस्ट विराजसने शेअर केली आहे. विराजस व शिवानीने ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स २०२४’ या पुरस्कार सोहळ्याची ट्रॉफी हातात घेतलेला फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसह त्याने असं म्हटलं आहे की, “एकाच क्षेत्रात काम करत असलो की कधी कधी असल्या गमती ही होतात”.

View this post on Instagram

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13_official)

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघेही आपापल्या कामासाठी घरी ट्रॉफी घेऊन जात आहोत”. यापुढे त्याने हॅशटॅग “अजून ट्रॉफीस हव्यात” असंही म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी त्यांना या पुरस्कारानिमित्त त्याचे कौतुक केलं आहे. “अभिनंदन”, “माझी आवडती जोडी”, “आम्हाला तुमची जोडी खूप आवडते”, “असेच कायम पुढे जात राहा” अशा अनेक कमेंट्स करत या फोटोला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Video : “आज आई-वडील असते तर…”, पुरस्कार स्वीकारताना ‘शिवा’ला अश्रू अनावर, तिला पाहून उपस्थितही रडले अन्…

दरम्यान, विराजसबद्दल बोलायचं झालं तर, त्याने झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेमुळे अल्पावधीतच विराजस घराघरात लोकप्रिय झाला. विराजस हा उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय लेखक आणि दिग्दर्शकही आहे. प्रायोगिक नाट्यक्षेत्रात विराजस अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.

आणखी वाचा – विमानतळावर ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्री व कुशल बद्रिकेची भेट, तोंडभरुन कौतुक करत म्हणाली, “तुझा अभिमान…”

तसेच शिवानीदेखील मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. स्टार प्रवाह वरील ‘सांग तू आहेस ना’ ही तिची मालिका गाजली होती. शिवानीने आपल्या अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या ती ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tags: International Iconic Awards 2024 Newsshivani rangolevirajas kulkarni
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Jaya Bachchan Mother Passed Away

Jaya Bachchan Mother Passes Away : जया बच्चन यांच्या आईचे निधन, दिवाळीपूर्वीच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, एकट्याच राहत होत्या कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.