शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लेहेंग्यामध्ये जिनिलिया देशमुखला चालताच येईना, तोल जाताच नवऱ्याने सांभाळलं अन्…; रेड कार्पेटवर फजिती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 23, 2024 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Bond

लेहेंग्यामध्ये जेनेलिया देशमुखला चालताच येईना, तोल जाताच नवऱ्याने सांभाळलं

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Bond : मनीष मल्होत्रा ​​दरवर्षी दिवाळीच्या आधी एक भव्य पार्टी आयोजित करतो. यावर्षीही त्यांनी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. डिझायनर-निर्माता मनीषच्या पार्टीत कलाकारांनी उत्तम वातावरण तयार केले. यावेळी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेक बॉलिवूड कलाकार यावेळी पारंपरिक वेशात हजेरी लावताना दिसले. या पार्टीत एका मराठमोळ्या आणि बॉलिवूड जोडीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही जोडी म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख. दोघांच्या पारंपरिक लूकने विशेष लक्ष वेधून घेतलं.

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अनेक कलाकार त्यांच्या आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होते. अनेकांनी हटके आणि पारंपरिक पद्धतीचे ड्रेसदेखील परिधान केलेले दिसून येत आहेत. यावेळी एका मराठमोळ्या जोडीने या सगळ्यामध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ही जोडी मराठी चित्रपट सृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक लोकप्रिय जोडी आहे. यावेळी रितेशने काळ्या रंगाचा कुर्ता, पायजमा परिधान केला होता. त्याचा हा स्टायलिश अंदाज अनेकांना आवडला.

आणखी वाचा – मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये कोण किती सुंदर दिसणार? यावरुन स्पर्धा, शाहरुख खानच्या लेकीवर भारी पडली रविना टंडनची मुलगी, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

तर यावेळी जिनिलियाने पिवळ्या रंगाची घागरा चोळी आणि त्यावर सुंदर अशी भरजरी गुलाबी रंगाची ओढणी परिधान केली होती. तिचा फुलणारा घागरा अधिक लक्ष वेधून घेत होता. पापराजींच्या कॅमेऱ्यात कैद होण्यासाठी येत असताना रितेश व जिनिलिया यांनी एकमेकांचा हात धरला होता. यावेळी चालताना जिनिलियाच्या पायात घागरा आला आणि ती अडखळली. तेव्हा रितेशने हात देत तिला सावरुन घेतलं. त्यांचा हा सुंदर बॉण्ड असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी रितेशची बायकोसाठीची काळजी पाहून त्याचं कौतुकही केलं.

आणखी वाचा – सूरज चव्हाणला घर बांधून देण्यावरुन हिणवणाऱ्यांना अंकिता वालावलकरचं उत्तर, म्हणाली, “बाहेर आल्यानंतर कळालं की…”

रितेश व जिनिलिया यांची जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. रितेशला प्रत्येक गोष्टीत जिनिलीयाने खंबीरपणे साथ दिली. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असते.

Tags: marathi celebrity coupleRiteish Deshmukh and Genelia DeshmukhRiteish Deshmukh And Genelia Deshmukh Bond
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte serial fame actress Rupali Bhosle shared photo with Kushal Badrike and said she is proud of him

विमानतळावर 'आई कुठे...' फेम अभिनेत्री व कुशल बद्रिकेची भेट, तोंडभरुन कौतुक करत म्हणाली, "तुझा अभिमान..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.