बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालीनी या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. हेमा या अभिनयाबरोबर राजकारणातदेखील अधिक सक्रिय आहेत. तसेच त्यांच्या नृत्यकलेचेदेखील कौतुक केले जाते. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी केलेल्या नृत्याला प्रेक्षकांची वाह वाहदेखील मिळते. काही महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी ईशा देओल पतीपासून वेगळी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावेळी त्यांनी लेकीला पाठिंबा दिला असल्याचेदेखील जाहीर केले होते. तेव्हा मुलीला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचे कौतुकदेखील केले तर काही अंशी ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. मात्र आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. (hema malini getting trolled)
हेमा सध्या दिल्लीमध्ये असून नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांची वागणूक बघून खूप चर्चादेखील होत आहे. तसेच त्यांची तुलना जया बच्चन यांच्याबरोबरही केली जात आहे. दरम्यान हेमा यांना दिल्ली येथे स्पॉट झाल्या. जेव्हा त्यांनी मीडियाला पाहिलं तेव्हा त्यांना खूप राग आला. मात्र त्यांनी पापाराझीना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांचे काही चाहते सेल्फी घेण्यासाठी आले पण हेमा यांनी लांब उभे राहून फोटो काढण्यास सांगितले.
हेमा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “खूप ओव्हरॲक्टिंग करत आहे”, दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “दुसरी जया व काजोल”, तसेच अजून एकाने लिहिले की, “ज्युनिअर जया बच्चन”.
दरम्यान हेमा यांच्या कामाबद्दल त्यांनी पहिल्यांदा १९६३ साली तमिळ चित्रपटात काम केले. त्यानंतर १९६८ साली ‘सपनो का सौदागर’ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘बागबान’, ‘वीरझारा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२० साली ‘शिमला मिरची’ या चित्रपटात दिसून आल्या होत्या. तसेच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्या धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकल्या होत्या. दोघांच्याही वयात १३ वर्षाचे अंतर आहे.