Ankita Walavalkar Emotional Post : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ हे पर्व विशेष गाजलं. यंदाच्या या पर्वात अनेक सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर्सची हवा असलेली पाहायला मिळाली. अगदी विजेते पदावर ही सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर्स सूरज चव्हाणचं नाव कोरलं. तर पहिल्या टॉप ५ मध्ये तिनही सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर्सची नावं असलेली दिसली. यंदाच्या या पर्वात kokanhearted गर्ल अंकिता वालावलकरची विशेष चर्चा रंगली. व्यवसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अंकिता बरीच चर्चेत राहिली. लवकरच अंकिता संगीतकार कुणाल भगतसह लग्न बंधनात अडकणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोशल मीडियावरुन प्रेमाची जाहीर कबुली तिने दिलेली दिसली.
सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारी अंकिता विविध आशयघन विषय हाताळत नेहमीच काही ना काही शेअर करताना दिसते. अशातच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंकिताने शेअर केलेली ही पोस्ट एका सामाजिक कार्यात सहभाग असलेली पाहायला मिळतेय. अशातच अंकिताने दिव्यांग व्यक्तींबरोबर काही वेळ एकत्र घालवलेला एक सुंदर असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आनंद फाऊंडेशनसाठी गेली बरीच वर्ष अंकिता काम करत आहे. यंदाच्या त्यांच्या या ५० व्या टूरमध्ये दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. त्यांच्यासह मुंबई दर्शनाचा आनंद अंकिताने लुटला.
आणखी वाचा – “शिमग्यातील सोंग कुठेय?”, अविनाश नारकरांना नेटकऱ्याने डिवचताच भडकल्या ऐश्वर्या, म्हणाल्या, “भोसले नावाचं…”
अंकिताने या टूरचा सुंदर असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “गेली बरीच वर्ष मी आनंद फाउंडेशनसाठी काम करतेय. यंदाची त्यांची ही ५० वी टूर दिव्यांग लोकांसाठी होती. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर मी अजूनही माझ्या घरी कोकणात गेली नाही आहे, विशेषतः मी या टूरसाठी थांबले होते. मुंबईत असलेल्या या दिव्यांग लोकांना मुंबईतील काही न पाहिलेल्या गोष्टी अनुभवता आल्या. बोटीतून फिरणं, बोटीत बसून डान्स करणं, हा अनुभव विलक्षणीय होता. त्यावेळी त्यांचे अनुभव ऐकताना खूप भरुन आलं. ‘बिग बॉस’च्या घरात असताना मला सहानुभूतीवरुन अनेक टोमणे मिळाले त्या लोकांना मला सांगायला आवडेल की, Sympathy आणि Empathy मधील फरक बहुदा त्यांना कळला नसावा”.
अंकिताने या व्हिडीओखाली कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “तसं म्हटलं तर Sympathy आणि Empathy हे दोन्ही शब्द एकच भावना व्यक्त करतात. दुसऱ्यापोटी असलेली कळकळ किंवा सहानुभूती. या दोन्ही शब्दांचा उपयोग इतरांबद्दलच्या काळजीच्या भावनांचे वर्णन करण्यासाठी केला जातो, परंतु त्यांच्यात मुख्य फरक आहे, ती भावना समजून घेण्याची खोली. Sympathy म्हणजे एक दुःखी आणि रडका चित्रपट पाहण्यासारखे आहे. आपल्याला त्या पात्रांबद्दल वाईट वाटते, परंतु आपण स्वतः त्यांचे दुःख अनुभवत नाही.
Empathy म्हणजे निव्वळ सहानुभूतीच्या पुढे काहीतरी! कल्पनेने दुसर्याच्या अंतरंगात शिरुन त्याच्या भावना जाणून घेण्याची कुवत म्हणजे empathy. स्वतःला दुसऱ्यामध्ये पाहण्याची आणि त्याच्या भावना त्याच्या दृष्टीकोनातून समजून घेण्याची ही क्षमता. संवेदनशीलता. पण एक गोष्ट लक्षात असुद्या, मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यासाठी sympathy आणि empathy, या दोन्ही अनुभूती महत्त्वाच्या आहेत. पहिली, तुमची काळजी दर्शवते, तर दुसरी तुमचे सखोल संबंध व समजूतदारपणा दाखवते”, असं म्हटलं आहे.