शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विवियान डिसेनाने पहिल्या पत्नीला फसवलं?, घटस्फोटापूर्वीच पत्रकार मुलीशी अफेअर अन्…; म्हणाला, “मला सहन करेपर्यंत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 19, 2024 | 12:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 18 Vivian Dsena

विवियन डीसेनाचे पहिल्या पत्नीबाबत भाष्य

Bigg Boss 18 Vivian Dsena : ‘बिग बॉस १८’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या हिंदी ‘बिग बॉस’मध्ये एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस १८’मधील विवियन डिसेना या स्पर्धकाची विशेष चर्चा रंगली आहे. विवियन डिसेनाची तुलना ‘बिग बॉस’ १३ मधील सिद्धार्थ शुक्लाशी केली जात आहे. त्याचे चांगले दिसणे, समजूतदार वृत्ती या सगळ्या गुणांमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विवियनला पाहून त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज लावला जात असला तरी त्याचे वैयक्तिक आयुष्यही सतत चर्चेत असते. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये त्याने पत्नीबाबत धक्कादायक खुलासे केला असल्याचं समोर आलं आहे.

अभिनेत्याने यापूर्वी २०१३ मध्ये ‘प्यार की ये एक कहानी’ सह-अभिनेत्री वहबिज दोराबजीबरोबर लग्न केले होते. परंतु २०२१ मध्ये त्यांचे हे नाते संपुष्टात आले. २०२२ मध्ये अभिनेता पुन्हा प्रेमात पडला आणि त्याने पत्रकार नूरन अलीशी लग्नगाठ बांधली. विवियन डिसेना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलतो, म्हणून जेव्हा त्याने याबद्दल खुलासा केला तेव्हा त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. ‘बिग बॉस १८’ मधील शिल्पा शिरोडकरशी झालेल्या संभाषणात विवियनने खुलासा केला की, तो एका मुलाखतीदरम्यान नूरनला भेटला आणि तिच्या प्रेमात पडला.

आणखी वाचा – “त्याने साधं झुरळही मारलं नाही तरीही…”, काळवीट प्रकरणावर सलमान खानच्या वडिलांचं भाष्य, म्हणाले, “सभ्य माणसं…”

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

तथापि, त्याने हे देखील सांगितले की, जेव्हा तो नूरनला भेटला आणि तिला डेट करु लागला तेव्हा त्याने त्याची माजी पत्नी वहबिझ दोराबजीपासून अधिकृतपणे घटस्फोट घेतला नव्हता. विवियनच्या कबुलीमुळे आश्चर्यचकित झालेल्या शिल्पाने त्याला त्या वेळेबद्दल विचारले. ज्यावर त्याने सांगितले की, तोपर्यंत तो वहबिझपासून वेगळा झाला होता आणि अधिकृतपणे घटस्फोटाच्या कागदपत्राचे काम सुरु झाले होते. आणि हे अगदी शेवटी निश्चित झाले आणि तोपर्यंत तो नूरनला डेट करत होता. त्यामुळे त्यात फसवणूक झाली नाही. अंतिम पेपरवर्क आणि त्यानंतर सर्व काही झाले”, असे विवियन म्हणाला.

आणखी वाचा – ६० सुरक्षा कर्मचारी, पोलिस बंदोबस्त अन्…; धमकी मिळाल्यानंतर सलमान खानसाठी ‘बिग बॉस’च्या सेटवर कडक नियम, जीव धोक्यात तरीही…

विवियनने सांगितले की, ‘दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे वाद होत होते. वाहबिझ जोपर्यंत त्याला सहन करु शकत होती तोपर्यंत त्याच्याबरोबर राहिली आणि नंतर जेव्हा तिला खूप कठीण झाले तेव्हा ती निघून गेली’.

Tags: Bigg Boss 18bigg boss 18 vivian dsenavivian dsena
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Ankush Chaudhari getting emotional while accepting the award on the death of late actor Atul Parchure video viral on social media.

पुरस्कार स्वीकारताना अंकुश चौधरीला अतुल परचुरेंची आठवण, पाणावले डोळे, म्हणाला, "त्याची खूप आठवण येतेय कारण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.