शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रजनीकांत यांच्या घरामध्ये पुराचं पाणी, चेन्नईमध्ये महागड्या परिसरात राहतात तरीही अशी अवस्था अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 17, 2024 | 12:54 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
South actor Rajinikanth home flooded Due to heavy rains in Chennai

चेन्नईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अभिनेते रजनीकांत यांच्या घरात पाणी शिरले आहे

तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह आसपासच्या जिल्ह्यांना सोमवारी रात्रीपासून पावसाने झोडपले आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सामान्य जनतेसह कलाकारांनादेखील बसत आहे. चेन्नईत सध्या मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. पावसाचे ही पाणी लोकांच्या घरामध्येही जात आहे. अशातच दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांनाही या पावसाच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रजनीकांत यांच्या आलिशान घरात पावसाचे पाणी शिरले आहे. तसंच त्यांच्या घराच्या आसपासचा परिसरही पाण्याखाली गेला आहे. (Rajinikanth Home Flooded)

अभिनेते रजनीकांत यांचे घर चेन्नईच्या एका महत्त्वाच्या भागात आहे. या परिसरात अनेक नामवंत व्यक्ती, व्यापारी, वकील राहतात. मात्र तरीही या ठिकाणी मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरी पावसाचे पाणी गेलं आहे. काही मीडिया रिपोर्टसनुसार, स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ पाणी उपसण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना सुरु केल्या आहेत. रजनीकांत यांचे कर्मचारीही पाणी निचरा करण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याची खात्री देत ​​आहेत.

#WATCH | Tamil Nadu: Severe waterlogging witnessed in parts of Chennai city after incessant rainfall in the region; visuals from Pattalam area. pic.twitter.com/bMUPUE2jMl

— ANI (@ANI) October 16, 2024

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर यांना मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, खास फोटो केला शेअर, म्हणाल्या, “कृतज्ञ…”

तमिळनाडूमध्ये ईशान्य मान्सूनच्या आगमनाने पावसाने जोर धरला आहे. चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पुराची समस्या उद्धभवली आहे. या पावसामुळे शाळा व महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ तसेच गोवा आणि बिहारमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये होणार मिड वीक एलिमिनेशन, ‘हा’ स्पर्धक जाणार घराबाहेर? सदस्यांनीच घेतला निर्णय

दरम्यान, रजनीकांत यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांची भूमिका असलेला ‘वेट्टियांन’ हा अ‍क्शन ड्रामा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रजनीकांत यांच्यारोबर अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पाच दिवसांत देशभरात १०० कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली आहे.

Tags: Rajinikanth Home FloodedRajinikanth Home Flooded NewsSouth Actor Rajinikanth
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Nick Jonas Viral Video

Video : भर कॉन्सर्टमध्ये पती निक जोनासला मारण्याचा प्रयत्न?, जीव मुठीत घेऊन पळाला अन्…; प्रियांका चोप्राही चिंतेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.