शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मृत्यूपूर्वी अभिनेत्याकडे व्यक्त केली होती इच्छा, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 14, 2024 | 4:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shahrukh khan teacher death

शाहरुख खानच्या शिक्षकांचे निधन

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्याबद्दल नुकतीच एक अपडेट समोर आली आहे. दिल्लीच्या शाळेतील टीचर एरिक स्टीव्ह डिसुजाचं निधन झालं आहे. नवी दिल्ली येथील सेंट कोलंबस स्कूलमध्ये त्याने शाहरुख खानला शिकवलं होतं. गोवा येथे रविवारी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. याआधी अनेकदा शाहरुखने त्याच्या आजारी शिक्षकांना भेटावे अशी सोशल मीडियावर विनंती केली जात होती. मात्र असे होऊ शकले नाही. अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. यामुळे आता शाहरुख खूप दु:खी असल्याचंदेखील बोललं जात आहे. दरम्यान आता सोशल मीडियावरदेखील याबद्दलची चर्चा रंगली आहे. (shahrukh khan teacher death)

कॉँग्रेस नेते सजारिता लॅटफ्लाग यांनी या वर्षी जून महिन्यात सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी शाहरुखकडे एक मागणी केली होती. यामध्ये त्यांनी शाहरुखने शिक्षक ब्रदर एरिक स्टीव्ह डिसूजा यांची भेट घ्यावी असे सांगितले होते. त्यांनी लिहिले होते की, “मला असं वाटत आहे की ही माझी शेवटची मागणी आहे. एरिक एस डिसूजा यांच्यातर्फे मी शाहरुख खानपर्यंत पोहोचण्याचा माझा हा शेवटचा प्रयत्न आहे”.

आणखी वाचा – “सलमानची जो मदत करेल त्याचा असाच हिशोब होणार”, बिश्नोई गँगच्या व्यक्तीची ‘ती’ पोस्ट व्हायरल, म्हणाला, “भावाला मारुन…”

With profound sorrow, I learned of the passing of Brother Eric Steve D'Souza, an exceptional educator renowned for his dedication to education and compassion. As an esteemed member of the Christian Brothers congregation, Brother D'Souza spent many years serving at St. Edmund's… pic.twitter.com/tjS3LD7dbt

— Conrad K Sangma (@SangmaConrad) October 13, 2024

पुढे त्यांनी लिहिले की, “दिवसेंदिवस एरिक यांची तब्येत खराब होत चालली आहे. मुंबईमधून विमानाने केवळ एका तासाच्या अंतरावर आहे. त्या आजारी असलेल्या व्यक्तीला सध्या सांत्वनाची गरज आहे. आपल्या आयुष्यात डीएएसयूची महत्त्वाची जागा राहिली आहे. यामुळे आपण आयुष्यात खूप काही करु शकलो आहोत. तुमचा आतापर्यंतचा प्रवास हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. पण त्यांच्या वाईट प्रसंगी तुमची उपस्थिती महत्त्वाची असणार आहे”.

आणखी वाचा – क्रिती सेनॉन व काजोल देवगण यांच्या ‘दो पत्ती’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी पाहता येणार चित्रपट

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी ब्रदर एरिक स्टीव्ह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “मला ब्रदर एरिक स्टीव्ह डिसूजा यांच्या निधनाबद्दल माहीत पडलं. ते शिक्षण व करुणा यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. आम्ही शिलॉंग येथील सेंट एडमंट स्कूल येथे अनेक वर्ष एकत्रितपणे घालवली आहेत. त्यांच्या निधनामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो”. दरम्यान आता ब्रदर एरिक डिसूजा यांच्या निधनावर शाहरुखने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  

Tags: shahrukh khansocial media postteacher death
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Dhananjay Powar, Vaibhav Chavan and Irina Rudakova visited Ambabai temple in Kolhapur.

Video : अंबाबाईचे दर्शन, कोल्हापुरी चप्पलची खरेदी अन्...; डीपीसह वैभव-इरीनाची कोल्हापुर सफर, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.