शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“व्यसन करतो का?”, सूरज चव्हाणला अजित पवारांनी विचारला प्रश्न, म्हणाला, “तुम्ही ‘बिग बॉस’मध्ये पाहिलं नाहीत का?”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 14, 2024 | 2:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deputy Chief Minister Ajit Pawar asking BIgg Boss Marathi 5 winner Suraj Chavan about addiction is video viral on social media

अजित पवारांनी सूरज चव्हाणला व्यसनाबद्दल प्रश्न विचारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व नुकतेच संपले असून सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी’चा विजेता झाला. सुरुवातीपासून प्रेक्षकांमध्ये या सीजनबद्दल मोठी क्रेझ पाहायला मिळाली होती. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने एन्ट्री केल्यापासून सूरजचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडताना दिसला. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे ‘बिग बॉस’च्या फायनलमध्ये पोहोचले होते. पण सर्वात जास्त मत पडल्याने सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी’चा विजेता झाला. सूरजच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक होतं. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: फोन करून त्याची भेट घेतली. (Ajit Pawar Suraj Chavan Talk)

सूरज चव्हाण व अजित पवार यांच्या या भेटीदरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सूरज ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन अजित पवार यांच्या भेटीला गेला होता. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होत असताना सूरजने मोठ्या उत्साहात त्याची डायलॉगबाजी सुरू केली. सूरजची ही डायलॉगबाजी ऐकून त्यांना हसू अनावर झालं होतं. यावेळी अजित पवार यांनी ‘सूरजला व्यसन करतो का?’ असा प्रश्नदेखील विचारला.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – सूरज चव्हाणच्या नावाचा वापर करत पैसे उकळण्याचा प्रयत्न, स्वतःच उघडकीस आणला प्रकार, म्हणाला, “फेक आयडी बनवून…”

यावेळी सूरजने अजित पवारांना उत्तर देत असं म्हटलं की, “मी कोणतेच व्यसन करत नाही. बिग बॉसच्या घरात तुम्ही मला पहिलं ना? मला कोणतेच व्यसन नाही”. यावर अजित पवारही सूरजचे कौतुक करतात. तसेच यापुढे ते त्याला शुभेच्छा देत असं म्हणतात की, “सूरजचे वागणे, बोलणे, चालणे बघून एकंदरीत अंदाज आला होता की तो यश मिळवेल आणि ते यश त्याने मिळवलं. याबद्दल आम्हा सर्वांना आनंद आहे. त्याच्या पुढच्या सर्व वाटचलीसाठी त्याला शुभेच्छा”.

आणखी वाचा – गोव्यात प्रेक्षकांच्या प्रेमामुळे भारावून गेला संकर्षण कऱ्हाडे, घरुन एकाने दडपे पोहेही आणले अन्…; म्हणाला, “हा निरोप…”

दरम्यान, सूरज चव्हाण याचा अजित पवारांनी सत्कार केला. यावेळी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी सूरजच्या प्रवासाविषयी माहिती घेतली. त्यासोबतच भविष्यात काय करणार विचारपूस करत जमेल ते सहकार्य करणार असल्याचा शब्दही दादांनी यावेळी सूरज चव्हाणला दिला.

Tags: Ajit Pawar Suraj Chavan TalkAjit Pawar Suraj Chavan Talk Marathi NewsAjit Pawar Suraj Chavan Talk News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Aishwarya Abhishek divorce rumors viral because of actress is not seen in the video shared on the occasion of Amitabh Bachchan's birthday

बच्चन कुटुंबियांबरोबर राहतच नाही ऐश्वर्या राय, 'त्या' व्हिडीओनंतर भांडणाचं सत्य समोर, घडलं असं काही की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.