बरेचदा आपल्याला कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबद्दल, त्यांच्या राहणीमानाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. ही कलाकार मंडळी कित्येकदा आपल्या रोजच्या जीवनाविषयी सोशल मीडियावर पोस्ट करत अपडेट देत असतात. तर काही कलाकार मंडळी आपल्या आयुष्याबद्दल सांगयला सोशल मीडियावर चाचपडत असतात. अशातच मराठी सिनेविश्वातली एक लोकप्रिय अभिनेत्री आहे जी तिच्या खाजगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर वेळोवेळी खुलेपणाने अपडेट देत असते. ती अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात.(Vanita Kharat Village Story)
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अव्वल स्थानावर आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या कार्यक्रमातील अभिनेत्री वनिता खरात ही कोळीवाड्याची रेखा म्हणून लोकप्रिय आहे. सामान्य लोकांप्रमाणेच राहणीमान असणाऱ्या वनिताने आजवर मराठी सिनेविश्वासोबत बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची हवा केली आहे.
पाहा काय आहे वनिताच्या गावाचं नाव (Vanita Kharat Village Story)
वनिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून तिच्या गावच्या घराचा असलेला फोटो पोस्ट केला आहे. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेली वनिताच मुंबईतही चाळीत घर आहे. आता तिने तिच्या गावच्या घराची झलक दाखवली आहे. वनिता ही कोकणातली आहे. कोकणातील देवगड हे वनिताचं गाव आहे. कोकणातलं तिचं हे घर निसर्गरम्य वातावरणात आहे. वनिताचं कोकणातील हे कौलारु घर विशेष लक्ष वेधून घेणारं आहे. तसेच घरासमोर मोठ अंगणही पाहायला मिळतंय.(Vanita Kharat Village Story)
हे देखील वाचा – प्राजक्ता माळीच बोल्ड फोटोशूट होतयं वायरल
वनिताने गावच्या घराचा फोटो सोबत “गावचं घर. हॅशटॅग देवगड” असं पोस्ट केलं आहे. वनिताने चार महिन्यांपूर्वीच सुमित लोंढेसोबत लगीनगाठ बांधली. चार महिने पूर्ण होताच वनिताने त्यांचा एकमेकांसोबतचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
