काही दिवसांपासून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे हे परदेशात दिसत होते. पण त्यांचं तिथे असण्याचं कारण मात्र स्पष्ठ होत न्हवत पण ते गुलदस्त्यात असणार कारण आता समोर आलं आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रतिभावंत कलाकारांचा एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Tejashree Pradhan Subodh Bhave)
हॅशटॅग तदेव लग्नम असं सुबोध आणि तेजश्रीच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला नावावरूनच हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणारा दिसतोय. मात्र या चित्रपटात काय पाहायला मिळणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. मनोरंजनात्मक आणि सहकुटुंब बघावा, असा हा सिनेमा असून लवकरच हा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. यात अनेक नामांकित कलाकार आहेत. ” तर निर्माते शेखर मते म्हणतात, ”हा विषय मला ऐकता क्षणीच भावाला आणि त्वरित या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना हा विषय निश्चितच आवडेल.”

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, ” नुकतीच आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली असून सध्या चित्रपटाबद्दलच्या अनेक गोष्टी पडद्याआड आहेत. लग्नसंस्थेवर आधारित जरी हा चित्रपट असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. एका परिपक्व नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारी ही कथा आहे. यापूर्वी असा विषय क्वचितच कोणी हाताळला असेल.शेखर मते निर्मित या चित्रपटाची कथा आणि पटकथा आनंद दिलीप गोखले यांचीच आहे. या चित्रपटासाठी मंदार चोळकर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीतलेखन केलं आहे तर पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे.(Tejashree Pradhan Subodh Bhave)
मराठीमधील या लाडक्या कलाकारांची केमीस्ट्री प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.