आलिया भट्टचे आजोबा म्हणजे तिच्या आईचे वडील नरेंद्रनाथ राजदान यांची आज १ जून २०२३ रोजी प्राणज्योत मालवली. समोर आलेल्या वृत्तानुसार ते फुफुसाच्या संसर्गाने पीडित होते. ब्रिजकँडी हॉस्पिटल मध्ये त्यांच्या वर उपचार सुरु होते.ते ९५ वर्षांचे होते. त्याची प्रकृती नाजूक असल्याने आलियाने तिचे परदेश दौरे देखील रद्द केले होते.(Aliaa Bhatt Grandfather Death)
या बाबतची माहिती आलिया भट्ट आणि तिची आई सोनी राजदान यांनी त्यांच्या सोशल मेडिया अकाउंट वर पोस्ट करून दिली आहे. भावुक अशा पोस्ट त्यांनी शेर केल्या आहेत.
आलिया भट्टची भावुक पोस्ट (Aliaa Bhatt Grandfather Death)
आलिया ने तिच्या इंस्टग्राम अकाउंट वरून आजोबांच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात व्हिडिओ मध्ये त्यांचा वाढदिवस चे सेलिब्रेशन पाहायला मिळते. तिच्या या पोस्टला आलियाने भावुक असे कॅप्शन दिले आहे.
हे देखील वाचा : मेटा गाला मध्ये आलियाला ऐश्वर्या अशी हाक मारली तरी तिने राखले परिस्थतीचे भान
तिने म्हंटल आहे, माझे आजोबा,माझे हिरो.वयाच्या ९३ व्या वर्षा पर्यंत ते गोल्फ खेळायचे.९३ व्या वर्षापर्यंत ते काम करत होते.सगळ्यात उत्तम ऑम्लेट ते बनवायचे. गोष्टी सांगायचे.पणती बरोबर खेळायचे. क्रिकेट,त्यांचे स्केच आणि कुटुंब यावर प्रेम करायचे.माझे हृदय आनंद आणि दुःखाने ही भरले आहे. त्यांनी आमच्या साठी जे काही केलं आहे त्यामुळे आम्ही धन्य आहोत.