शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आनंद शिंदे सूरज चव्हाणसाठी नवं गाणं घेऊन येणार, उत्कर्ष शिंदेची घोषणा, म्हणाला, “त्याच्यावर जळणारे लोक…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 7, 2024 | 12:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan winner Utkarsh Shinde sang a special song for his and he shared a subtle post.

Bigg Boss Marathi 5 चा विजेता होताच उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणसाठी तयार केलं खास गाणं, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन पाचचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. बिग बॉसच्या या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण हा विजयी ठरला आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त लोकप्रिय होत गेला. त्याचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला आणि सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलं आहे. त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालं आहे. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan Winner)

उत्कर्षने काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात सूरजसाठी एक गाणं करणार असल्याचे म्हटलं होतं आणि उत्कर्षने त्याचा शब्द पाळला आहे. उत्कर्षने सूरज विजयी होताच त्याच्यावर जबरदस्त गाणं केलं आणि ते संगीतबद्धही केलं. ‘बनला आण बाण बिग बॉसची शान आपला सूरज चव्हाण…’ असं या जबरदस्त गाण्याच्या ओळी आहेत. याचा व्हिडीओ शेअर करत उत्कर्षने सूरजच्या विजयावर नाराजी व्यक्त करण्याबद्दल मार्मिक पोस्ट लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणच्या बारामतीमधील गावात राडा, मित्रांचा गुलाल उधळत डीजेवर बेभान होऊन डान्स, व्हिडीओ व्हायरल

या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “आयुष्य जगून समजते. वाचून अथवा ऐकून नाही. बरेच जण म्हणाले सूरज ने काय वेगळं केल घरात? फक्त झापूक झुपूक तर केलं. आणि जिंकला त्यांना मला हेच सांगायचं आहे. घरात आपुलकी , मानसन्मान , कोणाचा निरादर नाही, कोणाची कधी कसलीच भीती नाही तर कोणासमोर माज, गर्व नाही. किंवा कोणासाठी मनात क्लेषही नाही. जे होतं ते स्वच्छ निर्मळ सरळ… खोटं नाट नाहीच. एकाग्र संयमी कासव उड्या मारणाऱ्या सश्यांना जसा हरवतो तसाच शांत एकाग्रतेने आपल्या खेळाशी एकनिष्ठ राहून ना लफडे ना झगडे फक्त १००% मेहनतीने आपला कासव सर्वांची मनेही जिंकण्यात आणि ट्रॉफी ही जिंकण्यात यशस्वी झाला”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या ग्रँड फिनालेनंतर अभिजीतच्या वाढदिवसांचं जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “माझी ट्रॉफी…”

यापुढे उत्कर्षने असं म्हटलं आहे की, “जसाच सूरज जिंकला हे कळाल इतका आनंद झाला की कार्यक्रम संपवून घरी येऊन सरळ स्टुडिओत आलो आणि लगेच हे गाण लिहलं रचला बनवल संगीतबध केलं गायल आणि लगेच आल्हाद बरोबर वीडियो शूट केलं .१ तासात गाण तयार.. सूरज जिंकल्याचं आनंद गाऊन नाचून साजरा केला. लवकरच महागायक आनंद शिंदे ह्यांच्या आवाजात मी सूरजच गाण घेऊन येतोच आहे. सूरज मित्रा तू लवकर फ्री हो, अख्या महाराष्ट्राला खूप नाचायचं आणि नाचवायचं आहे. बाकी सूरज जिंकला म्हणून ज्यांना कुठे जळत असेल त्यांनी बर्नोल क्रीम ओईंटमेंट लावावे. वाटल्यास त्याचे पैसे मी देईन”.

Tags: Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan Winnerutkarsh shindeUtkarsh Shinde sang a special song for Suraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
adnan sami mother passed away

सुप्रसिद्ध गायक अदनान सामीच्या आईचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर, म्हणाले, "आईचं निधन झालं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.