सध्या देशात सर्वत्र नवरात्रीची धूम आहे. मनोरंजन क्षेत्रातील सर्व कलाकारदेखील दुर्गा देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन असलेले दिसून येत आहेत. नुकताच एका दागिन्याच्या ब्रॅंडने नवरात्रीचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार दिसून आले. यामध्ये मलायका आरोरा, कृती सेनन, श्रद्धा कपूर असे कलाकार उपस्थित होते. हे सर्व कलाकार मुंबईमधील कलीना एअरपोर्टवर दिसून आले. यावेळी तिथे कतरिना कैफचीदेखील उपस्थिती पाहायला मिळाली. तिने मरुन रंगाची बांधणीची साडी नेसली होती. तिच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. सर्व कार्यक्रमात तिच्यावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. तसेच तिच्या सौंदर्याचेही खूप कौतुकदेखील केले गेले. मात्र या सगळ्यात प्रेक्षकांची नजर तिच्या हाताकडे गेली. (katrina kaif viral video)
कतरिना बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर ती अनेक कार्यक्रमांना हजर असलेली दिसून येते. तिने भारतीय संस्कृती पूर्णपणे आत्मसात केलेली दिसून आली आहे. अशातच आता तिने नवरात्रीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने जेव्हा प्रवेश केला तेव्हा चाहत्यांना अभिवादन केले आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेऊ लागली. यावेळी तिच्या हाताकडे सगळ्यांच्या नजरा गेल्या आणि त्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.
चाहत्यांबरोबर सेल्फी घेत असताना कतरिनाच्या उजव्या हाताच्या दंडावर एक काळ्या रंगाचा पॅच दिसून आला. यामुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तिचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “’कतरिना ठीक तर आहे ना?”, तसेच एकाने लिहिले की, “हा मेडिकल पॅच आहे”. अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “कतरिनाला मधुमेह तर नाही झाला ना?”
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, हा एक डायबेटीस पॅच असून ग्लुकोज तपासण्यासाठी केला जातो. हे लावल्यामुळे सारखंसारखं बोटाला सुई टोचण्याची गरज नसते. तसेच याचा वापर फिटनेस ट्रॅक करण्यासाठीदेखील वापरला जातो. पण आता कतरिना ठीक असेल अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.