शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तो असभ्य, स्वतःला मोठं समजून…”, मुकेश खन्ना यांचा कपिल शर्मावर राग, म्हणाले, “खूप अश्लील…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 3, 2024 | 4:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mukesh khanna on kapil sharma

मुकेश खन्ना यांनी कपिल शर्मावर साधला निशाणा

टेलिव्हिजनवरील एकेकाळी गाजलेली मालिका ‘शक्तिमान’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहे. या मालिकेमध्ये अभिनेते मुकेश खन्ना हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आले होते. सध्या ते मनोरंजन क्षेत्रात सक्रिय नसले तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असलेले पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्यांवर तंबाखूच्या जाहिरातीमध्ये काम करत असल्याने निशाणा साधला होता. सगळे कलाकार पैशासाठी हे सगळं करत असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं होतं.  मुकेश यांना जी गोष्ट पटत नाही त्यावर ते टीकादेखील करतात.अशातच आता त्यांनी एका अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. ज्यामुळे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा वक्तव्य करुन चर्चेत आले आहेत. (mukesh khanna on kapil sharma)

मुकेश यांनी नुकताच विनोदी कलकार कपिल शर्मावर निशाणा साधला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये कपिलला असभ्य असेही म्हंटले असून ‘अश्लील’ असा टॅग दिला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारले की, “द कपिल शर्मा शो’ व ‘बिग बॉस’ अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे का?” त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “कपिल एक चांगला विनोदी कलाकार आहे यामध्ये काहीही दुमत नाही. पण मला त्याचा स्वभाव पटत नाही. कपिलबरोबर सहज वावरु शकत नाही असं मी कृष्णा अभिषेकलादेखील सांगितलं.

आणखी वाचा – खून, पुरावे अन् स्कॅम…; Like आणि Subscribe चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, अमेय व अमृताच्या भूमिकांचं कौतुक

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

पुढे ते म्हणाले की, “मला दोन्हीही कार्यक्रम खूप अश्लील वाटतात. ‘कॉमेडी सर्कस’मध्ये हे लोक एकाच स्किटमध्ये काम करायचे. त्यावेळी कपिलने शक्तिमानचा पेहराव परिधान केला होता. कपिलच्या समोर एक मुलगी होती आणि बाजूला एक बेड होता. आम्ही ही व्यक्तिरेखा खूप मेहनतीने तयार केली आणि तुम्ही बेडच्या इथे शक्तिमानचा पेहराव दाखवून तुम्ही काय सांगू इच्छिता. तुम्ही हे सगळं विनोदासाठी करत आहात. मी कृष्णाला फोन केला आणि याबद्दल विचारलं. त्याने सांगितलं की ते स्किट मी करणार होतो पण नंतर ही भूमिका कपिलने साकारली”.

आणखी वाचा – “स्वतःच्या लेकी-सूनांबरोबर असंच वागतात का?”, स्त्रियाच अधिक ट्रोल करत असल्याचं ऐश्वर्या नारकरांचं वक्तव्य, म्हणाल्या, “बायकाच अधिक…”

तसेच कपिलबरोबर सहजता नसण्याबद्दल मुकेश यांनी सांगितले की, “मी व कपिल एका इव्हेंटमध्ये एकत्र आलो होतो. कपिलने त्यावेळी त्याच्या  करिअरची सुरुवात केली होती. कपिल माझ्याबरोबर 15-20 मिनिटं बसला होता. पण तो माझ्याशी काहीही बोलला नाही. त्याने त्याचा पुरस्कार घेतला आणि निघून गेला. कपिल मला खूप असभ्य वाटला. जेव्हा कोणी असं वागतं तेव्हा त्याची इज्जत गेलेली असते. तुम्ही स्वतःला इतकं मोठं का समजता?” सध्या कपिल ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चे दुसरे पर्व सुरु आहे.

Tags: kapil sharmamukesh khannashaktimaan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 mid week eviction

Bigg Boss Marathi मधून एकाचवेळी दोन सदस्य घराबाहेर पडणार?, दोन नावांची रंगली चर्चा, टॉप ५ असणार…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.