Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस ‘मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या अंतिम आठवडा सुरु आहे. या अंतिम आठवड्यात देखील घरातील सदस्यांमधील समीकरणं बदललेली पाहायला मिळत आहेत. अभिजीत व अंकितामध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे सतत दोघं भांडताना दिसत आहेत. तसंच निक्की व जान्हवी यांच्यातील दुरावा मिळातल्यानंतर आता एकमेकींबरोबर चांगल्या बोलताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता काही दिवसांवर ‘बिग बॉस मराठी’चा पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा संपन्न होणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा विजेता घोषित होणार आहे.
अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर व वर्षा उसगांवकर हे सात स्पर्धक आता ‘बिग बॉस’च्या घरात उरले आहेत. यापैकी तिकीट टू फिनालेमध्ये सूरजवर मात करत निक्की या घराची पहिली ग्रँड फायनलिस्ट ठरली आहे. तर उर्वरित सहा स्पर्धक नॉमिनेशनच्या प्रक्रियेत आहेत. अशातच ‘बिग बॉस’ यांनी या वीकमध्ये मिड वीक एव्हिक्शन होणार असल्याचे घोषित केले आहे.
‘बिग बॉस’ यांनी मिड वीक एव्हिक्शनची स्पर्धकांना आठवणही करुन दिली. हा ‘बिग बॉस’च्या घरातील सगळ्यात कठीण काळ आहे, असं म्हणतानाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत नेटकऱ्यांनी सूरजला सपोर्ट केला आहे. तर ‘अंकिता एलिमिनेट होणार’, ‘बाय बाय वर्षा ताई’, ‘अंकिता आऊट’, ‘बाय बाय कोकण कन्या’ अशा कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे आजच्या भागात अंकिता, वर्षा ताई यांपैकी एक सदस्य घराबाहेर पडणार अशा चर्चा रंगल्या आहेत. आता ‘बिग बॉस’च्या घरातून वर्षा ताई की अंकिता कोणाचा प्रवास संपणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, नेटकरी अभिजीत सावंत, सूरज चव्हाण व निक्की तांबोळी या स्पर्धकांना पहिल्या तीन स्पर्धकांमध्ये पाहत आहेत. तर सूरज चव्हाणला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरुन पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी तर सूरजचं या पर्वाचा विजेता होणार असल्याचे जाहीर केले आहे.