शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “त्याच्याबरोबर नातं टिकवणार नाही”, अभिजीतबद्दल डीपी स्पष्टचं बोलले, म्हणाले, “त्याने ज्याप्रकारे…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 3, 2024 | 10:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates DP aka Dhananjay Powar said that he will not maintain his relationship with Abhijeet Sawant.

Bigg Boss Marathi 5 मध्ये डीपी अर्थात धनंजय पोवार यांनी अभिजीत सावंतबरोबरचं नातं टिकवणार नसल्याचे म्हटलं आहे.

Bigg Boss Marathi 5 : ‘बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आता ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काहीच दिवसांत या पर्वाचा विजेता किंवा विजेती जाहीर होणार आहे. सध्या घरात एकूण ७ सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. गेल्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे हे ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडले. अशातच आता ‘बिग बॉस’नं मिड वीक एलिमिनेशन होणार असल्याचं सांगितलं होतं आणि तेच एलिमिनेशन आज पार पडणार आहे.  (Dhananjay Powar On Abhijeet Sawant)

‘बिग बॉस’च्या घरात नुकताच सेलिब्रेशन आठवडा पार पडला. घरातील स्पर्धकांना आपला प्रवास एका चित्रफितीच्या माध्यमातून पाहता आला. आतापर्यंत झालेल्या ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये अंतिम आठवड्यात घरातील सगळ्या स्पर्धकांना त्यांचा प्रवास दाखवला जातो. मात्र यावेळी तो थोडा आधीच दाखवला गेला. यासाठी घरात शिव ठाकरेची एन्ट्री झाली होती. आपला प्रवास पाहून घरातील प्रत्येक सदस्य भावुक झाला. यावेळी डीपी म्हणजेच धनंजय पोवारने स्वत:चा प्रवास पाहिल्यानंतर स्वतःशीच संवाद साधला. यावेळी त्याने घरातील निघून गेलेल्या सदस्यांबद्दलचे मत व्यक्त केले.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – नवरात्रीच्या पहिल्या दिवशी चित्रा नक्षत्रात इंद्र योग तयार झाल्यामुळे कर्क राशीसह ‘या’ राशींच्या लोकांवर देवीची कृपा

यावेळी डीपी यांनी असं म्हटलं की, “काय मस्त प्रवास होता. खतरनाक… नादखुळा… त्या प्रवासात माझा खेळ दाखवण्यात आला. कोण काय बोललं हे दाखवण्यात आलं. काही लोकांवर आपण प्रेम केलं हे दाखवलं. काही लोक आपल्याबद्दल बोलले ते दाखवलं. या घरात मला वैभवसारखा एक मित्र आणि अंकितासारखी एक बहीण मिळाली आणि ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पॅडीदादसारखा एक व्यक्ती मला मिळाला. पण त्याला समजून घेणे आमच्याकडून कमी पडलं. आम्ही त्याला कमी समजू शकलो”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 मध्ये आज होणार एलिमिनेशन, कोणता सदस्य घेणार शेवटचा निरोप?

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “यासाठी मी पॅडीदादाची माफी मागेन, एवढी नाती मी नक्कीच टिकवेन. अभिजीतबरोबर काय होईल माहीत नाही, कारण त्याने ज्यापद्धतीने पलटी मारली. त्यावरुन मला वाटत नाही त्याच्याबरोबर मला नातं टिकवता येईल…”. दरम्यान,  ‘बिग बॉस’नं मिड वीक एलिमिनेशन होणार असल्याचं सांगितलं होतं आणि तेच एलिमिनेशन आज पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या एलिमिनेशनमध्ये घरातील नक्की कोणता सदस्य बाहेर जाणार? याची सदस्यांबरोबरच प्रेक्षकांनाही धाकधूक लागून राहिली आहे.   

Tags: abhijeet sawantbigg boss marathi 5DP aka Dhananjay Powar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
saurabh choughule Special Post for yogita chavan

नवऱ्याचे भलतेच लाड पुरवतेय योगिता चव्हाण, बनवली 'ही' खास डिश, सौरभने कौतुकही केलं, म्हणाला, "लग्न करा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.