काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांचं निधन झालं होतं. राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेत त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर मलायकावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी तिने सोशल मीडियावर एकच पोस्ट केली होती. यामध्ये तिने वडिलांसाठी प्रार्थना सभा आयोजित केली असल्याचे सांगितले होते. या प्रार्थनासभेसाठी बॉलिमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर मलायका सोशल मिडियावर शांत असलेली पाहायला मिळाली. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी ती खूप प्रयत्नदेखील करत आहे. अशातच तिची एक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिच्या पोस्टकडे आता बऱ्याच जणांचे लक्षदेखील वेधले आहे. (malaika arora social media post)
वडिलांच्या निधनानंतर मलायका स्वतःला सावरण्यासाठी वेळ देत होती. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली अभिनेत्री वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र पूर्णपणे शांत झाली. अशातच आता तिची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. मलायकाचा वाढदिवस ऑक्टोबर महिन्यात असतो. तसेच तिची रास वृश्चिक आहे. त्यामुळे आता हा महिना चांगला जावा अशी आशा व्यक्त केली आहे.

मलायकाने स्कॉर्पियो पेजची एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिले आहे की, “ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी चांगला राहणार आहे, वृश्चिक”. हा संदेश तिच्या कठीण काळामध्ये आशेचा किरण आहे. मलायका व तिची बहीण अमृता सध्या कठीण प्रसंगामधून जात आहेत. यावेळी दोघींना त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी खूप साथ दिली आहे. त्यांची खास मैत्रीण करीना कपूर व करिश्मा कपूर त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या नेहमीच तिच्या बरोबर असलेल्या पाहायला मिळाल्या.
त्याचप्रमाणे अर्जुन कपूरदेखील तिच्या बरोबर नेहमी दिसून आला. काही महिन्यांपूर्वी दोघंही विभक्त झाल्याचया अनेक बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन अर्जुन तिच्या बरोबर दिसून आला. अंतिम संस्कारापासून प्रार्थनासभेपर्यंत तो तिच्याबरोबर होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी अर्जुनचे खूप कौतुकदेखील केले होते.