शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “अंकिता खूप कुचकी”, निक्की-जान्हवीने मिळून अंकिताला केलं टार्गेट, नाश्ता न बनवण्यावरुन गोंधळ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 1, 2024 | 1:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 nikki tamboli

'बिग बॉस मराठी'च्या घरात निक्कीने केलं अंकिताला टार्गेट

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा आता शेवटचा आठवडा राहिला आहे. हे पर्व संपायला शेवटचे काही दिवस राहिले असून आता स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. या पर्वाचा आता शेवटचा आठवडा असूनही स्पर्धक मंडळींमधील वाद काही संपत नाही आहेत. शेवटच्या आठवड्यातही स्पर्धक मंडळी भांडताना दिसत आहेत. दरम्यान, निक्की तांबोळी या स्पर्धकाने अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांशी वाद घातला. तिला इतर स्पर्धकांचे अनेक मुद्दे खटकताना दिसले. मात्र इतर स्पर्धकांनीही निक्कीला वेळोवेळी उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. अशातच समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्कीचा पारा पुन्हा एकदा चढलेला पाहायला मिळाला.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की व अंकिता यांच्यात वाजलं असल्याचं दिसत आहे. आणि निक्की अंकिताची जान्हवीकडे चुगली करताना दिसत आहे. काही दिवसांपासून निक्की अंकिताच्या हात धुवून मागे लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरजला घर देण्यावरुन निक्कीने अंकिताला बरेचदा टोकलं आहे. निक्कीचा अंकितावर असलेला राग आता पुन्हा पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर जान्हवी व निक्की यांच्या मैत्रीत आलेला दुरावा आता संपताना दिसत आहे. दोघी पुन्हा एकदा बोलताना दिसत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “सर्व गोष्टी भीक म्हणून…”, निक्की तांबोळी पहिली Finalist होताच नेटकरी भडकले, म्हणाले, “तिच्या सोयीनुसार…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

अशातच निक्कीने अंकिताची खटकलेली गोष्ट जाऊन जान्हवीला सांगितली आहे. निक्कीच्या या स्टॅन्डला जान्हवीने पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्की म्हणते, “तुला मी खरं सांगू का?, इतकं घाण दिसेल की तिचं पलटली आहे. आर्याच जेवण मी थांबवलं तेव्हा ‘बिग बॉस’ मला ओरडले. आणि तेव्हा हिने स्टॅन्ड घेतला हे अगदी योग्य होतं. आज ती स्वतः चुकली”. यावर जान्हवी म्हणते, “मुद्दा तुझा अगदी बरोबर होता”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : जान्हवी-निक्कीमध्ये पुन्हा मैत्री, दोघींचंही वागणं खरं की खोटं?, आधी एकमेकींना नको नको ते बोलल्या अन्…

यानंतर निक्की म्हणते, “अन्न न विचारणं म्हणजे हेच झालं ना. तिने नाश्ता बनवलाच नाही. मग तिने ही ड्युटी का घेतली. तू सूरजचा टास्क करुन, तुझा टास्क हरून, सांगकाम्या म्हणून तू जेवण बनवलं. तू करत नाही असं म्हणून शकली असतीस पण तू तसं केलं नाहीस. ही मुलगी खूप कुचकी आहे. एक नंबरची कुचकी मुलगी आहे”.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5nikki tamboli ankita fight
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
malaika arora social media post

वडिलांच्या आत्महत्येनंतर इन्स्टाग्रामवर मलायका अरोराची पहिली पोस्ट, संपूर्ण घर कोलमडल्यानंतर म्हणाली, "आता सगळं काही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.