शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi 5 : “माझा साखरपुडा झालाच नाही”, निक्कीच्या आईच्या आरोपांवर अरबाज पटेलचं स्पष्टीकरण, म्हणाला, “तिची समजूत काढेन आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 27, 2024 | 2:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Arbaz Patel reacted on Nikki Tamboli mother's statement about his engagement Rumour

Bigg Boss Marathi 5 मधील अरबाजचा साखरपुडा झाल्याच्या निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर स्वत: अरबाजने प्रतिक्रिया दिली आहे

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे.  हा शो आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे नुकताच या घरात ‘फॅमिली स्पेशल’ एपिसोड पार पडला. नुकत्याच झालेल्या गुरुवारच्या भागात घरात वर्षा, अभिजीत व डीपी यांच्या घरातील कुटुंबीयांनी हजेरी लावली. आजच्या भागात उर्वरीत सदस्यांच्या कुटुंबियांची घरात एंट्री होणार आहे, यावेळी निक्कीची आईदेखील घरात येणार आहे आणि याचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्कीची आई तिला घरात भेटायला आली असून यावेळी ती अरबाजचा साखरपुडा झाला असल्याचे निक्कीला सांगते.(Arbaz Reacted on His Engagement Rumour)

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्कीच्या आईने तिला अरबाजबद्दल काही गोष्टी सांगताच निक्कीने अरबाजबरोबरचं तिचं नातं संपवलं असल्याचे म्हटलं आहे. या प्रोमोमध्ये निक्कीची आई निक्कीला असं म्हणते की, “अरबाज चुकीचा चालला आहे. त्याने असं नाही करायला पाहिजे. त्याचा साखरपुडा झालेला आहे असं म्हणतात”. त्यानंतर निक्की असं म्हणते की, “हे अरबाज-निक्की जे होतं ना ते आता संपलं आहे”. या प्रोमोनंतर सर्वत्र अरबाजच्या साखरपुड्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या सर्व चर्चांवर आता स्वत: अरबाजने भाष्य केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “त्याच्या साखरपुडा झाला आहे आणि…” आईने निक्कीला सांगितले अरबाजचे सत्य, ऐकून बसला धक्का, म्हणाली. “आता सगळं संपलं अन्…”

इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याने ब्रॉडकास्ट चॅनेल सुरु करत त्याद्वारेच प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मी आत्ताच कलर्स मराठीवरील प्रोमो बघितला आणि त्यात निक्कीची आई म्हणते की अरबाजचा साखरपुडा झाला आहे. पण मी हे सांगू इच्छितो की माझा साखरपुडा झालेला नाही किंवा लग्नही झालेलं नाही. या सगळ्या अफवा आहेत. यावर विश्वास ठेवू नका, माझ्याबद्दलच्या या सगळ्या अफवा आहेत. निक्की हे ऐकून प्रतिक्रिया व्यक्त करणारच कारण तिला बाहेरची परिस्थिती माहित नाही. खरं काय खोटं काय याबद्दल तिला कल्पना नाही. पण टेन्शन घेण्यासारखे काही नाही.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : इंडस्ट्रीत काम देणार म्हणून जान्हवी वर्षाताईंची सेवा करत असल्याचे निक्कीकडून टोमणे, हे नाटक की अभिनेत्रीचा खरा स्वभाव?

यापुढे त्याने “आम्ही भेटलो की, मी निक्कीला याबद्दल समजावेनच. तिने समजून घेतलं तर ठीक आहे नाही तर माझी काही हरकत नाही. पण माझ्या साखरपुड्याबद्दलच्या बातम्या सगळ्या अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका”. असं म्हटलं आहे.दरम्यान, या घरात निक्की व अरबाज यांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती, भाऊच्या धक्क्यावर अरबाजने तो कमिटेड असल्याचे कबूल केल्यानंतरही त्याची निक्कीबरोबर जवळीक होती. या घरात दोघांमध्ये अनेकदा वादही झाले. पण तरीही त्यांचे खास नातेही प्रेक्षकांना पाहायला मिळाले. 

Tags: Arbaz PatelArbaz Reacted on His Engagement Rumourbigg boss marathi 5
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 suraj chavan emotional video

Bigg Boss च्या घरात सूरजला भेटायला आल्या बहिणी व आत्या, 'ते' दृश्य पाहून सगळ्यांनाच अश्रू अनावर, निक्कीने तर मिठी मारली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.