झी मराठी वहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीला गाण्याचा वसा तिच्या वडिलांकडून मिळाला होता. कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड स्वत: उत्तम गायक व संगीतकार आहेत. त्यामुळे आपल्या वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत गायिकेने आपल्या आवाजाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आजवर अनेक गाण्यांना तिने आवाज दिला आहे. यामुळे ती कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. आपल्या सुमधुर आवाजामुळे कायमच चर्चेत असणारी गायिका नुकतीच एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आणि या चर्चेचं कारण म्हणजे ती आई झाली. (Kartiki Gaikwad Romantic Post)
आपल्या गायनाने चर्चेत राहणारी गायिका कार्तिकी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर ती आपले गायनाचे व्हिडीओ शेअर करत असते. तसंच ती तिच्या पतीबरोबरचे काही खास फोटोही शेअर करत असते. अशातच तिने तिच्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास फोटो शेअर केला आहे आणि नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तू माझ्या हृदयाचे ठोके आणि माझ्या मनाचे विचार आहेस”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 चा महाचक्रव्यूह टास्क जिंकण्यासाठी पॅडी व सूरज यांची दमछाक, बाजी मारणार का?
यापुढे तिने “आपणांस उदंड आयुष्य, आरोग्य, आनंद लाभो ही माऊलींचरणी प्रार्थना” असंही म्हटलं आहे. १० डिसेंबर २०२० रोजी कार्तिकी गायकवाडचं लग्न झालं होतं. रोनित पिसे असं कार्तिकीच्या पतीचं नाव आहे. रोनित हा पेशाने मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्याचा स्वत:चा व्यावसाय आहे. रोनित हा कार्तिकीच्या वडीलांच्या मित्राचाच मुलगा आहे. रोनित पिसे हा व्यावसायिक असला तरीही रोनितला संगीताची विशेष आवड आहे आणि तो एक उत्तम तबलावादकदेखील आहे.
‘सारेगमप’मुळे कार्तिकीला खूप लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील तिचं ‘घागर घेऊन’ हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. दरम्यान कार्तिकी आणि रोनित यांचा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर कार्तिकी आणि रोनित थायलंडलाही गेले होते. त्यांच्या थायलंड ट्रीपची चर्चा सर्वत्र रंगली होती. अशातच नुकतीच गायिका आई झाली असून या खास क्षणाचे फोटोही तिने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते.